Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

भंगाराम तळोधीची ज्ञान शाळा ई- मॅरोथॉन मध्ये झाली सहभागी.

सुशिलाबाई रामचंद्रराव मामीडवार कॉलेज ऑफ सोशल वर्क पडोली , चंद्रपूर.आणि सी. वाय. डी. ए. संस्था पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने १९ नोव्हेंबर “जागतिक शौचालय दिवस २०२०” च्या निमित्ताने ई मॅरेथॉनचे करण्यात आले आयोजन.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:

गोंडपिपरी, दि. १६ नोव्हेंबर: चंद्रपूर जिल्ह्यासाठी मॅरेथॉनचे नेतृत्व व समन्वयसाठी समाजकार्य महाविद्यालयाची निवड करण्यात आली व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील साकूरे यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली ई- मॅरेथॉन साठी जिल्ह्या चे समन्वयक प्रा. डॉ. सुभाष गिरडे व प्रा. किरणकुमार मनुरे यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना मॅरेथॉन साठी आव्हान केले. मॅरेथॉन चा हेतू देशातील नागरिकांमध्ये स्वच्छता आणि आरोग्य बाबत जागृती निर्माण करणे आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा


या मॅरेथॉन मध्ये लॉकडाऊन च्या काळामध्ये अनिकेत दुर्गे या युवकाने सुरू केलेली लॉकडाऊन ज्ञानशाळा भंगाराम तळोधी यांनीसुद्धा आपला सहभाग नोंदविला आहे. तसेच गावातील युवक वर्गाचा मोठ्या प्रमाणात या उपक्रमाला प्रतिसाद मिळतो आहे. पुढील पाच दिवस २१ किलोमीटर चा प्रवास या ई. मॅरेथॉन च्या माध्यमातून पूर्ण करणार आहे.
१५ नोव्हेंबर ते १९ नोव्हेंबर २०२० या पाच दिवसात ही ई. मॅरेथॉन चालणार आहे. देशाच्या वेगवेगळ्या भागातून एक लाखापेक्षा अधिक व्यक्तींनी या उपक्रमात आपला सहभाग नोंदविला आहे. धावेचे निरीक्षण करण्यासाठी विशिष्ट अॅॅप ची निर्मिती करण्यात आलेली आहे. ई- मॅरोथॉन राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय संस्थांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केले आहे, ज्यात, युनिसेफ, प्लॉन इंटरनॅशनल, एन.एस.सी. फाउन्डेशन, तेर्रे देस होम्स, सेव्ह द चिल्ड्रन, वॉटर एड, राष्ट्रीय सेवा योजना आणि सी.वाय.डी.ए. संस्था इ. चा समावेश आहे.
ई- मॅरोथॉन पूर्ण करणाऱ्या व्यक्तींना ई- प्रमाणपत्र आयोजकांकडून देण्यात येणार आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.