मुबंई महानगरपालिका निवडणुक भाजप स्वबळावर लढेल
देवेंद्र फडणवीस यांचे रायगडमध्ये मोठे वक्तव्य..
रायगड ०६ डिसेंबर :- राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस रविवारी एक दिवसाच्या रायगड जिल्हा दौऱ्यावर होते .अलिबाग तालुक्यातील रेवदंडा येथे कोळी महासंघाच्या वतीने मच्छिमारांना जाळी , शितपेट्या, टब, बोटींचे नुकसान झालेल्या मच्छिमारांना धनादेश वाटप कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी फडणवीस उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाप्रसंगी पत्रकारांनी मुबंई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोबत घेणार का असा प्रश्न उपस्थित केला असता मुबंई महानगरपालिकेची निवडणुक भाजप स्वबळावर लढेल अशी सुचक प्रतिक्रिया राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली . यावेळी व्यासपीठावर विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर माजी पालकमंत्री रविंद्र चव्हाण आमदार प्रशांत ठाकूर आमदार रमेश पाटील आमदार रविंद्र पाटील आमदार निरंजन डावखरे उपस्थित होते.
Comments are closed.