Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

बोरी येथे शाँट सर्किटमुळे घर जळाले मात्र सुदैवाने जिवीतहानी टळली.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अहेरी, दि. ६ डिसेंबर: अहेरी तालुक्यातील ग्रामपंचायत बोरी अंतर्गत मुख्य चौकातील माजी सरपंच व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री दिलीप भटपल्लीवार यांच्या घराला शनिवार ५ डिसेंबर २०२० रोजी दुपारच्या सुमारास शाँट सर्किटमुळे आग लागल्याची घटना घडली. यामध्ये घरात असलेले जमिनीचे व बँकेच्या तसेच सर्व मालकीच्या ट्रँक्टर चे महत्त्वाचे दस्तऐवज व घरगुती वापरासाठी असलेली फ्रीज व अन्य जिवन आवश्यक वस्तू आगीत जळून खाक झाले असून यात त्यांचे खुप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

भटपल्लीवार व त्यांच्या कुटुंबातील सदस्य हे लग्न समारंभाच्या कार्यक्रमात गेले होते.मात्र दुपारच्या सुमारास शाँट सर्किटमुळे घरात आग लागल्याने घरातून धूर निघत असल्याने आग लागल्याचे भटपल्लीवार यांचे किरायदार लिंगलवार यांच्या लक्षात आले किरायदाराने आरडाओरड करीत गावकऱ्यांना मदतीसाठी बोलाविले आगीचा धोका लक्षात घेत गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असलेल घटनेची माहीती मीळताच माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा जिल्हा महामंत्री भाजपा श्री रवींद्र ओल्लालवार,कार्तीक गोंड्रालवार, अनिकेत ओल्लालवार, लिंगाजी दुर्गे, राजू गोट्टमवार,लिंगलवार, राजू संगर्तीवार,दिलीप ओल्लालवार, मुकेश ठाकरे, मोरेश्वर मोहूर्ले, व गावातील अन्य नागरीक उपस्थित होते या आगीमध्ये भटपल्लीवार कुटुंबीयांचे सर्वस्व जळून खाक झाल्याने मोठे संकट कोसळले

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Comments are closed.