होळी निमित्त मध्य रेल्वेच्या वतीनं अधिकच्या ४८ रेल्वे गाड्या सोडल्या जाणार
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
मुंबई: होळी निमित्त मध्य रेल्वेच्या वतीनं अधिकच्या ४८ रेल्वे गाड्या सोडल्या जाणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी दिली आहे. यापूर्वी होळीसाठी २८ अधिकच्या गाड्या चालवल्या जाणार असल्याची घोषणा केली होती. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरून १६ गाड्या चालवल्या जाणार असून, नागपूरला ८, मढगावला ४ आणि कन्याकुमारीला ४ गाड्या चालवल्या जातील.
लोकमान्य टीळक टर्मिनस वरून ३६ हून अधिक गाड्या चालवल्या जातील, यामध्ये दानापूर साठी ६ फेऱ्या, महू साठी ८ फेऱ्या, तर बनारस, समस्तीपूर, तिरुवनंतपूर, मढगाव, नांदेडसाठी ४ प्रत्येकी ४ फेऱ्या जाणार आहेत. तर पुण्यावरून दानापूरसाठी ६, गाझीपूरसाठी ८, हजरत निजामूद्दीनसाठी ४ तर नागपूरसाठी ८ गाड्या जाणार आहेत.
पूर्वी घोषित केलेल्या २८ गांड्यांसाठी २४ आणि २५ तारखेपासून तिकिटांची बूकिंग सुरु झाली असून, आज घोषित केलेल्या ४८ गाड्यांसाठी उद्या आणि १ तारखेपासून तिकिटांची बूकिंग सुरु होईल.
Comments are closed.