Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांचं शिरवाडे-वणी गावीची कवितेचं गाव म्हणून मंत्री उदय सामंत यांची घोषणा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

नाशिक:-  जिल्ह्यात निफाड तालुक्यात कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या शिरवाडे-वणी या गावाची कवितेचं गाव म्हणून मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी घोषणा केली. तसंच त्याअंतर्गत पहिल्या मराठी दालनाचं उद्धाटनही सामंत यांच्या हस्ते आज झालं. नाशिकमध्ये शिरवाडे वणी या गावात कुसुमाग्रज यांच्या नावाने पुढच्या वर्षीपासून दोन दिवसीय कुसुमाग्रज महोत्सवाचं आयोजन केलं जाईल, अशी घोषणा त्यांनी कुसुमाग्रज विद्यालयात आयोजित कार्यक्रमात केली.

पुढील तीन ते चार महिन्यात हे कवितेचं गाव पूर्ण होईल, या दालनात प्रत्येक विद्यार्थ्याने जाऊन कवितांचे वाचन करावं, वाचन संस्कृती मुळेच वाचन संस्कृती वृद्धींगत होईल, आणि त्यातून इतर गावांनाही प्रेरणा मिळेल असं नियोजन केलं जाईल, असं सामंत म्हणाले. नवी दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज यांची युद्धनीती आणि गनिमी कावा या विषयावर अध्यासन सुरू करण्याचा निर्णय सरकारनं घेतला असून, याठिकाणी कुसुमाग्रज यांचं मराठी अध्यासन सुरू करण्यात येईल. आणि लवकरच ते कार्यान्वित होईल, असं आश्वासन त्यांनी दिलं. तसंच आगामी काळात बाल, युवक आणि महिलांसाठी साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात येईल, असं त्यांनी सांगितलं.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आगामी काळात बाल, युवक आणि महिलांसाठीही साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात येईल. संत तुकाराम महाराज यांचे सर्व अभंग ई- बुक स्वरूपात लवकरच येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
साहित्यिकांसाठीही ही एक प्रेरणादायी गोष्ट असून, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर पहिल्याच वर्षी असा उपक्रम राबविला गेला, हे मराठी भाषा मंत्री म्हणून आपल्यासाठी ते अत्यंत अभिमानास्पद असल्याचं ते म्हणाले. या प्रसंगी मंत्री दादाजी भूसे, दिलीपकाका बनकर, शोभा बच्छाव, हेमंत टकले, भाऊ चौधरी तसेच कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांची नात पियू शिरवाडकर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Comments are closed.