Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आव्हान शिबिरातून साहसी विद्यार्थी तयार होऊन त्याचा उपयोग समाजासाठी होईल : विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

गडचिरोली, 03 जानेवारी 2024 – गडचिरोली जिल्ह्यातील लोकांची इथल्या मातीशी आणि जंगलाशी आपुलकी आहे. याचा आम्हाला अभिमान आहे. या सांस्कृतीशी एकरूप होण्यासाठी तुम्ही आलात म्हणून तुमचं कौतुक, गडचिरोली मध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांना शिक्षा म्हणून पाठविले जाते. गडचिरोली मध्ये नोकरदार यायला बघत नाही. मात्र आल्यावर गडचिरोली सोडून जात नाही ही या मातीची किमया आहे. प्रामाणिक आणि प्रेमळ माणसे इथे आहे. मी कुठेही असलो तरी मला आनंद गडचिरोली मध्ये मिळतो.राज्याच्या कानाकोपऱ्यातुन विद्यार्थी इथे आले आहेत. नक्कीच गडचिरोली शहर नावारूपाला येण्यास यामुळे मदत होईल. आपत्ती निवारणासाठी आधुनिक तंत्रज्ञान आले आहे, मात्र हे तंत्रज्ञान वापरण्यापूर्वी तुमच्यासारख्या प्रशिक्षित विद्यार्थ्यांची गरज पडते.गडचिरोली जिल्हा वनसंपदा आणि खनिजांनी श्रीमंत आहे अनेक शहरात पर्यावरणाचा ऱ्हास झाला आहे, मात्र गडचिरोली मध्ये शुध्द ऑक्सिजन आहे. येथील गोंड संस्कृती सर्वात प्राचीन संस्कृती आहे. असा विश्वास विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्यस्तरीय आपत्ती निवारण शिबिर आव्हान 2023 च्या समारोप समारंभी व्यक्त केला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

राज्यस्तरीय आपत्ती निवारण शिबिर आव्हान२०२३ च्या समारोप समारंभा प्रसंगी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते . यावेळी मंचावर गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे , प्र-कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण, फाईव्ह एन. डी. आर. एफ.पुणेचे असिस्टंट कमांडन्ट, निखिल मुधोळकर, अधिष्ठाता विज्ञान व तंत्रज्ञान डॉ.अनिल चिताडे, अधिष्ठाता मानव विज्ञान विद्याशाखा डॉ. चंद्रमौली, वित्त व लेखाअधिकारी भास्कर पठारे, निरीक्षक समिती सदस्य राजभवन डॉ. नितीनप्रभु तेंडुलकर, गोंडवाना विद्यापीठाचे रासेयो संचालक तथा आव्हान २०२३ चे समन्वयक डॉ. श्याम खंडारे, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य विवेक गोर्लावार, नंदाजी सातपुते, रंजना लाड, गोंडवाना विद्यापीठाचे परीक्षा संचालक डॉ. दिनेश नरोटे आदी उपस्थित होते.

याप्रसंगी विरोधीपक्ष नेते विजय विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते गोंडवाना रेडिओ या नव्या इंटरनेट रेडीओ चे उद्घाटन करण्यात आले. फाईव्ह एन. डी. आर. एफ.पुणेचे असिस्टंट कमांडन्ट, निखिल मुधोळकर, निरीक्षक समिती सदस्य राजभवन डॉ. नितीनप्रभु तेंडुलकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे,अध्यक्षीय समारोप करताना म्हणाले, आव्हान शिबिरासाठी पुरेशा सोयीसुविधा नसतानाही आमच्या चमूने शिबिर यशस्वी करून दाखवले . मला माझ्या संपूर्ण टीमचे कौतुक आहे . कुठेतरी कमी जास्त असतेच. आव्हान शिबिरापासून विद्यार्थानी मी माझ्या समाजातील लोकांना आपत्तीपासून वाचवले पाहिजे. समाजातील लोकांच्या कामात मला कस येता येईल. असा बोध घेतला पाहिजे. महाराष्ट्रातील इतर जिल्हा सारखाच गडचिरोली जिल्हा आहे पुन्हा पुन्हा अनेक कार्यक्रमासाठी गडचिरोली जिल्हा आपल्याला आवाज देत राहील आपण त्याला साद घालत राहा असे ते म्हणाले.

आव्हान २०२३ चे प्रशिक्षणार्थी कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव सौरभ सुनिल माळी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आर्या धनविजे, मुंबई विद्यापीठाचे विद्यार्थी विवेक परमार, रायगड जिल्हा संघनायक डॉ.अनिल झेंडे, नांदेड विद्यापीठाच्या संघनायिका डॉ.कल्पना जाधव, संघनायिका पुणे विद्यापीठ ज्योती मने, विद्यार्थी मुंबई विद्यापीठ विवेक परमार यांनी मनोगत व्यक्त केले. आव्हान२०२३ चे अहवाल वाचन गोंडवाना विद्यापीठाचे रासेयो संचालक तसेच आव्हान २०२३चे समन्वयक डॉ. श्याम खंडारे यांनी केले. केवळ रामजी हरडे महाविद्यालयाची विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त रासेयो स्वयंसेवक जान्हवी पेद्दीवार आणि रासेयो विभागीय समन्वयक डॉ. पवन नाईक यांचा विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

विद्यार्थ्यांना पुरस्कार वितरण

सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय स्वयंसेवक पुरस्कार, चेतन गौरी भारत, मुंबई विद्यापीठ, ओम मोहिते, हैदराबाद सेंटर नॅशनल कॉलेजिएट विद्यापीठ मुंबई ,सर्वोत्कृष्ट रासेयो स्वयंसेवीका पुरस्कार अनुश्री निलेश घरत, डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली ,सर्वोत्कृष्ट रासेयो स्वयंसेवक पुरस्कार, मयुरी पवार सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी, पुणे सर्वोत्कृष्ट रासेयो संघनायक पुरस्कार स्वप्निल कुमार साहेबराव काळे ,संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती,सर्वोत्कृष्ट रासेयो संघ नायिका पुरस्कार, डॉ. ताहीरा मीर, कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र जळगाव विद्यापीठ, सर्वोत्कृष्ट रासेयो संघ रॅली भंडारा जिल्हा , राष्ट्रसंथ तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर, उत्कृष्ट रासेयो संघ शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर .

या कार्यक्रमाचे आभार गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण यांनी तर संचालन मराठीचे स. प्रा. डॉ. नीलकंठ नरवाडे यांनी केले. पुढील आव्हान शिबिर अमरावती येथील संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात होणार असून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे रासेयो संचालक डॉ. संतोष येवले यांच्याकडे आव्हान ध्वज सुपूर्द करण्यात आला. या दहा दिवसीय आव्हान शिबिरासाठी आव्हान समन्वयक डॉ. प्रिया गेडाम यांच्यासह सर्व शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

हे पण वाचा :-

पुनः वाघांच्या हल्यात महिला ठार, वनाधिकारी मानव – वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी उपाय योजना करतील ?

भ्रष्टाचाराचे कुरण भाग: ४ ठाणे मुख्य वनसंरक्षक कार्यालयातील अनागोंदी कारभाराविरोधात कारवाईचा केवळ दिखावा…

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.