Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जिल्हयात टाळेबंदी बाबत बदल, दुकानांच्या वेळेत वाढ शनिवारी ही दुपारी 3.00 वा पर्यंत दुकानांना मुभाकोरोना संसर्ग संपलेला नाही, गर्दी न करण्याचे जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांचे आवाहन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली :03 ऑगस्ट, जिल्हयात कोरोना संसर्गाबाबत जमावबंदी व टाळेबंदीसंदर्भात नवीन नियमावली आणि उपाययोजना 03 ऑगष्ट पासून लागू करण्यात आल्या आहेत. यामध्ये यापुर्वी सुरू असलेल्या दुकांनाच्या वेळेत रात्री 8.00 वा.पर्यंत वाढ करण्यात आली आहे. तसेच शनिवारी दुकाने दुपारी 3.00 वा.पर्यंत सुरू असणार आहेत. रविवारी मात्र अत्यावश्यक सेवा वगळून सर्व बंद राहतील असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. कोरोना संसर्ग संपलेला नाही, गर्दी न करण्याचे जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी आवाहनही केले आहे. आदेशांनूसार शासन व जिल्हा प्रशासनाचे निर्देशाप्रमाणे वेळोवेळी निर्गमित केलेले आदेशातील सर्व निर्देश, सूचना, अटी व शर्तीचे पालन करणे सर्व संबंधितांना बंधनकारक असेल.  कोविड-19 साथरोगसंदर्भाने शासनाचे आदेश, जिल्हा प्रशासनाचे आदेशांमधील अटी, शर्ती, दंडाबाबत निर्देंशाचे काटेकोर पालन करणे सर्व संबंधित व्यक्ती, आस्थापना व शासकीय-निमशासकीय विभागांना बंधनकारक असेल.

यामध्ये बदल केले आहेत 

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

  • अत्यावश्यक सेवेत मोडणारी दुकाने अत्यावश्यक सेवेत मोडणाऱ्या दुकानांना सोमवार ते शुक्रवार चे सकाळी7.00 ते  रात्रौ 8.00 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा असेल. तर शनिवार ते रविवार ला सकाळी 7.00 ते  दुपारी 3.00 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा असेल.अत्यावश्यक सेवा वगळून इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार चे सकाळी7.00 ते  रात्रौ 8.00 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा असेल. तर शनिवारला सकाळी 7.00 ते  दुपारी 3.00 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा असेल. तथापि रविवारला सदर दुकाने पूर्णत: बंद असतील.
    • सार्वजनिक गार्डन,क्रीडांगण इ. सर्व सार्वजनिक बगीचे, क्रीडांगण हे व्यायाम, मॉर्निंग वॉक, सायकलिंग इत्यादी कारणाकरिता सुरु असेल.
    • खाजगी/शासकीय कार्यालयातील उपस्थिती100% उपस्थितीसह सुरु राहतील.
    • सार्वजनिक वाहतूक व्यवस्था100 टक्के क्षमतेसह सुरु ठेवता येणार तथापि सदर वाहनांमध्ये आसन व्यवस्थेव्यतिरिक्त उभ्याने प्रवासी नेण्यास मनाई असेल.
    • व्यायामशाळा,सलून, ब्युटीपार्लर, स्पा, वेलनेस सेंटर्स इ. सदर दुकानांना सोमवार ते शुक्रवार चे सकाळी 7.00 ते  रात्रौ 8.00 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा असेल. तर शनिवारला सकाळी 7.00 ते  दुपारी 3.00 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा असेल. तथापि रविवारला सदर दुकाने पूर्णत: बंद असतील. सदर ठिकाणे 50 टक्के क्षमतेसह सुरू ठेवण्याची मुभा असेल तथापि सदर ठिकाणांमध्ये एसी चा वापर करता येणार नाही.
    • मॉल,सिनेमागृह/नाट्यगृह पुढील आदेशापर्यंत बंद असतील.
    • धार्मिक स्थळे पुढील आदेशापर्यंत बंद असतील.
    • शाळा/महाविद्यालये/कोचिंग क्लासेस शिक्षण विभाग तसेच उच्च तंत्रशिक्षण विभाग यांचे निर्देशानुसार लागू राहील.
    • रेस्टॉरेन्ट,उपहारगृह सोमवार ते शुक्रवार चे सकाळी 7.00 ते  दुपारी 4.00 वाजेपर्यंत 50% डायनिंग क्षमतेसह सुरू ठेवण्याची मुभा असेल. तथापि पार्सल/होम डिलीव्हरी सुरु ठेवता येईल.
    • संचारबंदी रात्रौ9.00 ते  सकाळी 5.00 वाजेपर्यंत वैध कारणाशिवाय बाहेर फिरण्यास मनाई असेल.
    • वाढदिवस,सामाजिक, सांस्कृतिक, मनोरंजन, निवडणुका, निवडणुक प्रचार सभा, रॅली, निषेध कार्यक्रम इ. ठिकाणची गर्दीबाबत पुढील आदेशापर्यंत मनाई असेल.
    • विवाह कार्यक्रम कोविड-19निर्देशाचे अधिन राहून सामाजिक अंतर राखून एकूण 50 लोकांच्या मर्यादेत कार्यक्रम पार पाडण्याची मुभा असेल. तथापि याचे उल्लंघन केल्यास रु. 50000/- दंड व संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येईल.
    • अंत्यविधी कोविड-19निर्देशाचे अधिन राहून एकूण 20 लोकांच्या मर्यादेत कार्यक्रम पार पाडण्याची मुभा असेल.
    • आठवडी बाजार पुढील आदेशापर्यंत बंदच असतील.

    सदरील आदेशाचे पालन न करणारी/ उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा समुह यांनी साथरोग प्रतिबंधक कायदा 1897, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 तसेच भारतीय दंड संहिता 1860 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे.

     

    हे देखील वाचा

  • https://loksparsh.com/health/7-corona-free-5-new-corona-affected-in-gadchiroli-district-on-tuesday/19618/

दुर्गम भागातील इच्छुकांनी इग्नू मधील मोफत दुरस्थ शिक्षणाचा लाभ घ्यावा – जिल्हाधिकारी दीपक सिंगला

तीन वर्षांच्या सई हत्तीणीच्या पिल्याचा अचानक मृत्यू झाल्याने वनविभागाच्या वर्तुळात उडाली खळबळ.

 

 

  

Comments are closed.