Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी घेतली राज्यपालांची भेट

'लोकशाही समजून घेताना' महत्वाचा दस्तावेज : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

मुंबई डेस्क, दि. १५ फेब्रुवारी :  ‘लोकशाही समजून घेताना’ हे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने तयार केलेले पुस्तक नव्या पिढीसाठी महत्त्वाचा दस्तावेज असल्याचे उद्गार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे काढले.

राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी व प्रधान सचिव श्रीकांत देशपांडे यांनी मंगळवारी (दि. १५) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेऊन त्यांना ‘लोकशाही समजून घेताना’ हे पुस्तक भेट दिले, त्यावेळी राज्यपाल बोलत होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मुंबई विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक दीपक पवार यांनी संपादित केलेल्या व मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांनी प्रकाशित केलेल्या या पुस्तकात विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींनी लिहिलेल्या लोकशाही व निवडणूक प्रक्रियेशी संबंधित ३३ लेखांचा समावेश करण्यात आला आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

पुस्तकामध्ये भारतीय निवडणूक यंत्रणा आणि लोकशाहीचे स्वरूप; विविध व्यवस्था आणि लोकशाही; विविध समाज घटक आणि लोकशाही; माध्यमे, तंत्रज्ञान, कला आणि लोकशाही; तसेच, लोकशाही – मुक्तचिंतन या मुख्य विषयांवरील लेखांचा समावेश करण्यात आला आहे.

हे देखील वाचा :

चंद्रपुरात वाघोबाचे दर्शन, व्हिडीओ व्हायरल

काँग्रेसचा नगर पंचायतींमध्ये सर्वाधिक बोलबाला

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.