Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

काँग्रेसचा नगर पंचायतींमध्ये सर्वाधिक बोलबाला

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
यावर्षी पहिल्यांदाच आदिवासी विद्यार्थी संघाने नेत्रदीपक कामगिरी केली आहे. माजी आमदार दीपक आत्राम आणि जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या नेतृत्वार्त अहेरी आणि सिरोंचा नगर पंचायतीवर सत्ता प्रस्तापित केली आहे. शिवाय, भामरागड आणि एटापल्ली नगर पंचायतीमध्येही आविसंला सत्तेत सहभागी होता आले. मुलचेरात प्रयत्न थोडक्यात  असफल राहले असले तरी एकूणच आविसंची ही कामगिरी आगामी काळात जिल्हा परिषद निवडणुकीसाठी लक्षवेधी ठरणार असल्याने प्रस्थापितांच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे.

गडचिरोली, दि. १५ फेब्रुवारी :  जिल्ह्यात १४ फेब्रुवारीला आणि १५ फेब्रुवारीला एकूण ९ नगर पचायतींच्या नगराध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी निवडणूक झाली. यामध्ये नगर पंचायतींच्या नगराध्यक्ष व उपाध्यक्ष पदांच्या निवडणुकीत कॉंग्रेसने ४ नगरपंचायतींवर सत्ता प्रस्थापित केली. शिवसेना आणि आदिवासी विद्यार्थी संघाने प्रत्येकी दोन, तर भाजपने एका नगर पंचायतींवर वर्चस्व प्रस्तापित केले. प्रमुख पक्षांनी केवळ सत्तेसाठी आपापल्या सोयीनुसार आघाड्या करुन सत्ता प्रस्थापित केली, हे प्रामुख्याने नगर पंचायतींच्या निवडणुकी दरम्यान दिसून आले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

काँग्रेस, शिवसेना, भाजप आणि आविसंची प्रत्येकी एका नगरपंचायतीवर सत्ता

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

जिल्ह्यातील कोरची नगर पंचायतीवर काँग्रेसने राष्ट्रवादी कॉंग्रेस समर्थित अपक्ष उमेदवाराच्या सहकार्याने सत्ता मिळविली. येथे काँग्रेसच्या हर्षलता भैसारे नगराध्यक्ष, तर राष्ट्रवादी काँग्रेस समर्पित अपक्ष उमेदवार हिरा राऊत उपाध्यक्ष म्हणून विजयी झाले.

मुलचेरा नगरपंचायतीत शिवसेनेचे विकास नैताम नगराध्यक्ष तर राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर वेलादी उपाध्यक्ष म्हणून निवडून आले.
सिरोंचा नगरपंचायतीत आदिवासी विद्यार्थी संघाच्या शेख नगराध्यक्ष, तर शेख बबलू पाशा यांनी उपाध्यक्ष म्हणून विजय संपादन केला.

भामरागड नगरपंचायतीच्या अध्यक्षपदी भाजपच्या रामबाई महाका तर उपाध्यक्षपदी आदिवासी विद्यार्थी संघाचे विष्णू मडावी निवडून आले.

हे देखील वाचा :

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु निवासस्थानाच्या वीज बिल वापरात डॉ सुहास पेडणेकर यांची आघाडी

पट्टेदार वाघ मृतावस्थेत आढ़ल्याने वनविभागात उडाली खळबळ..

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Comments are closed.