Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पट्टेदार वाघ मृतावस्थेत आढ़ल्याने वनविभागात उडाली खळबळ..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

प्रस्थापित परिक्षेत्रात आधीपासून असलेला वाघ अन्य कोणत्याही दुसऱ्या नर वाघाला आपल्या परिक्षेत्रात येऊ देत नाही. त्यामुळे दोन नर वाघ आमने- सामने आल्यास त्यांच्यात लढाई होण्याचे प्रसंग अनेक वेळा होतात. ही लढाई इतकी भीषण असते की दोन्ही वाघ गंभीर जखमी होतात. त्यात कमजोर असलेला वाघ हार पत्करून निघून जातो किंवा प्रसंगी त्याचा मृत्यू ओढवतो. या वाघाचा मृत्यू त्यातूनच झाला असण्याची शक्यता वन कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

गडचिरोली दि,१३ फेब्रुवारी : आलापल्ली वन विभागात असलेल्या  आल्लापल्ली वनपरिक्षेत्रातील  नेंडर कक्ष. क्र. १२ मध्ये एक पट्टेदार वाघ रविवारी मृतावस्थेत आढळून आल्याने वनविभागात खळबळ माजली आहे .

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आलापली वनविभागात वाघाचे अस्तित्व असून घनदाट जंगलाने हि व्यापलेले आहे .या ठिकाणी वाघासह इतर हि वन्यप्राणी मोठ्या संख्येन पहायला मिळतात.सदर जंगलात वाघ आपआपले कार्यक्षेत्रात दबदबा निर्माण करून ठेवतात.यात नवीन वाघ जंगलात शिरकाव केला गेला असेल आणि यातच दोन नर वाघासोबत झालेल्या वर्चस्वाच्या लढाईत त्यातील दीड वर्षाचा नर जातीच्या एका वाघाचा मृत्यू  शनिवारी रात्री घडली असण्याची अंदाज वनाधिकार्यांनी  व्यक्त केला आहे.

जंगलातील नेंडर कक्ष. क्र. १२ मध्ये सदर घटनाजंगलात  लावलेल्या  ट्रॅप कॅमेरात कैद  झाले आहे का हे सुधा वनाधिकारी शोध घेत आहेत तर  मागील महिन्यात आलापल्ली वनपरिक्षेत्रातील मौसम येथे एका पट्टेदार वाघिणीची शिकार करण्यात आली होती. त्यामुळे वनविभागाने या प्रकरणाचाही गांभीर्याने पहाणार आहेत .

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

वाघाच्या घटनेची  माहिती मिळताच वन विभागाचे सर्व वरिष्ठ अधिकारी घटनास्थली दाखल झाले असून  याबाबत अधिक माहिती देण्यास नकार दिला असला आहे घटनास्थळी  पशुवैद्यकीय अधिकारी पोहचले असून शवविच्छेदनातून मृत्युचा उलगड़ा होणार आहे .

Comments are closed.