Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अतुल उरकुडे यांची पशुधन विकास अधिकारी म्हणून नियुक्ती

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

ब्रम्हपुरी, दि. १३ फेब्रुवारी :  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण ब्रह्मपुरी येथील डॉ.अतुल उरकुडे यांची पेरमिली तालुका अहेरी जिल्हा गडचिरोली येथे पशुधन विकास अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे.

अतुल उरकुडे यांचे प्राथमिक शिक्षण कोरची येथे झाले तर माध्यमिक शिक्षण ब्रह्मपुरी येथे झाले.
बीएससी शिक्षण नागपूर येथे पूर्ण केल्यानंतर त्यांनी एमपीएससी ची परीक्षा दिली. त्यामध्ये उत्तीर्ण झाल्याने पशुधन विकास अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती झाली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

डॉ. अतुल उरकुडे यांची आई विद्या, वडील प्रभाकर उरकुडे मोठा भाऊ व लहान भाऊ उच्चशिक्षित आहेत. वडील प्रभाकर उरकुडे यांनी गडचिरोलीसारख्या दुर्गम जिल्ह्यात नोकरीची सेवा देऊन मुलांना उच्च शिक्षित बनविले आहे. अतुल उरकुडे यांची पशुधन विकास अधिकारी म्हणून निवड झाल्याबद्दल परिसरात सर्वत्र कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

हे देखील वाचा : 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

पट्टेदार वाघ मृतावस्थेत आढ़ल्याने वनविभागात उडाली खळबळ..

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज आंमत्रित

घुग्घुस, पोलीस स्टेशनमध्ये असलेल्या दुचाकी वाहनांच्या लिलावासाठी निविदा आमंत्रित

 

 

Comments are closed.