Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कुलाबा-वांद्रे-सीप्झ मुंबई मेट्रो-३ मार्गावरील भुयारीकरणाचं काम १००% पूर्ण !

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

 मुंबई 1 डिसेंबर :- मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३ मार्गावरील मुंबई सेंट्रल स्थानकावर आज ४२ वा आणि प्रकल्पातील अंतिम भुयारीकरणाचा टप्पा पार पडला. अपलाईन मार्गावरील या भुयारीकरणाला एकूण ४३ दिवसांचा कालावधी लागला. यामध्ये ५५८ काँक्रीट रिंग्सचा वापर करण्यात आला.

मेट्रो-३ मार्गातील सर्वात लांब पट्ट्यांपैकी एक असलेल्या पॅकेज-३ मध्ये मुंबई सेंट्रल, महालक्ष्मी, सायन्स म्युझियम, आचार्य अत्रे चौक आणि वरळी या मेट्रो स्थानकांचा समावेश आहे. पॅकेज-३ अंतर्गत महालक्ष्मी मेट्रो स्थानक ते मुंबई सेंट्रल मेट्रो स्थानकापर्यंतची ८३७ मीटरची सर्वात आव्हानात्मक भुयारीकरणाचं काम रॉबिन्सच्या टीबीएम तानसा-१ नं यशस्वीरित्या पूर्ण केलं. मुंबई मेट्रो-३ या प्रकल्पाचं एकूण ७६.६% काम पूर्ण झालं आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

‘आज मेट्रो-३ च्या भुयारी मार्गाचं काम १००% पूर्ण झालं, या क्षणाचे साक्षीदार होताना याचा मला अतिशय आनंद होत आहे. हा मार्ग मुंबईच्या ऐतिहासिक वारसा इमारती, जुन्या व मोडकळीस आलेल्या इमारती, सध्याचा मेट्रो मार्ग, रेल्वे मार्ग, नदी आणि कठीण भौगोलिक रचना असलेला परिसर आदींच्या खालून आणि अगदी जवळून जात असल्यानं मेट्रो-३ साठी भुयारीकरण करणे खूपच आव्हानात्मक होतं, ‘असं मत मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी व्यक्त केलं.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे पण वाचा :-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.