Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

दिलासादायक! मराठा आरक्षण आंदोलनातील सर्व गुन्हे राज्य सरकारने घेतले मागे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

पुणे डेस्क : मराठा समाजासाठी अत्यंत महत्त्वाची व दिलासादायक बातमी आहे. मराठा आंदोलनात दाखल करण्यात आलेले सरसकट सर्व गुन्हे राज्य सरकारने मागे घेतले आहे. त्यामुळे खासदार संभाजी छत्रपती यांनी राज्य सरकारचे आभार मानले आहेत.

मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलक सातत्याने आंदोलन करत आहेत. या आंदोलकांनी मूक मोर्चांवर भर दिला होता. तर काही मोर्चांना आणि मराठा आंदोलकांनी पुकारलेल्या बंदला हिंसक वळणही लागलं होतं.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

त्यामुळे अनेक आंदोलकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. हे गुन्हे तात्काळ मागे घेण्याची सातत्याने मागणी होत होती. स्वत: खासदार संभाजी छत्रपती यांनी आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली होती.

या आधीच्या गृहमंत्र्यांकडेही त्यांनी ही मागणी केली होती. आज अखेर सरकारने त्यांची मागणी मान्य केली आहे. राज्य सरकारने आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतल्याने संभाजी छत्रपती यांनी राज्य सरकारचे आभार मानले आहेत. तर मराठा तरुणांनीही संभाजी छत्रपती यांचे आभार मानले आहेत.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :

वनपरिक्षेत्र अधिकारी आणि लिपिकावर निलंबनाची टांगती तलवार!; वनकर्मचाऱ्यांनी दस्ताऐवजासह केली लेखी तक्रार

देशात सध्या ‘खुर्ची’ साठी किळसवाणा प्रकार सुरु

वनविभागाद्वारे हेतुपुरस्पर मानहाणी करण्याचा प्रयत्न – संतोष ताटीकोंडावार यांची तक्रार

 

 

Comments are closed.