Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

दिलासादायक! चंद्रपूर जिल्ह्यात आज मृत्यु शुन्यावर तर ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या कमी

चंद्रपूर जिल्ह्यात आज 13 कोरोनामुक्त तर 11 नवीन कोरोना बाधितांची नोंद.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

चंद्रपूर, दि. 6 जुलै : गत आठवड्यापासून जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या मृत्युची संख्या शुन्यावर आली असून ॲक्टीव्ह रुग्णसंख्यासुध्दा प्रचंड कमी झाली आहे. गत 24 तासात जिल्ह्यात 13 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तर 11 जण नव्याने पॉझिटीव्ह आले आहेत. जिल्हयात मंगळवारी एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही.

आरोग्य विभागाच्या प्राप्त अहवालानुसार बाधित आलेल्या 11 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 1 , चंद्रपूर तालुका 1, बल्लारपूर 2, भद्रावती 0, ब्रम्हपुरी 0, नागभीड 0, सिंदेवाही 0, मुल 3, सावली 0, पोंभूर्णा 0, गोंडपिपरी 2, राजूरा 1, चिमूर 0, वरोरा 1, कोरपना 0, जिवती 0 व इतर ठिकाणच्या 0 रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 84 हजार 750 वर पोहोचली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 83 हजार 49 झाली आहे. सध्या 169 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 5 लाख 70 हजार 876 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 4 लाख 83 हजार 156 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1532 बाधितांचे मृत्यू झाले आहे.

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :

तहसीलदारांची अवैध रेती वाहतूक करणाऱ्यावर धडक कारवाई

दिलासादायक! Paytm कंपनीकडून वापरकर्त्यांसाठी खास सुविधा; त्वरित मिळेल ६० हजार रुपयांपर्यंत कर्ज

गडचिरोली जिल्ह्यात आज 18 कोरोनामुक्त, तर 24 नवीन कोरोना बाधित

 

Comments are closed.