Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

दिलासादायक! Paytm कंपनीकडून वापरकर्त्यांसाठी खास सुविधा; त्वरित मिळेल ६० हजार रुपयांपर्यंत कर्ज

पेटीएमने आपल्या बाय नाउ, पे लेटर सर्विसचा विस्तार करुन पोस्टपेड मिनी लाँच केलं आहे. याद्वारे कंपनी छोटी-मोठी कर्ज देणार आहे.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

वृत्तसंस्था, जुलै : जर तुम्ही पेटीएम वापरकर्ता (युजर) असाल, तर तुमच्यासाठी दिलासादायक बातमी आहे. पेटीएमवर आता काही मिनिटांतच लोन उपलब्ध होणार आहे. पेटीएमने आपल्या बाय नाउ, पे लेटर सर्विसचा विस्तार करुन पोस्टपेड मिनी  लाँच केलं आहे. याद्वारे कंपनी छोटी-मोठी कर्ज देणार आहे.

कंपनीने यासाठी आदित्य बिर्ला फायनान्स लिमिटेडसह पार्टनरशिप केली आहे. कंपनीने सांगितलं, की छोट्या टिकीट तात्काळ लोनमुळे ग्राहकांना चांगली सुविधा मिळेल आणि कोरोना व्हायरसच्या काळात घरगुती खर्चांची सोय होण्यास मदत होईल.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

पोस्टपेड मिनी लाँचसह कंपनी ६०००० रुपयांपर्यंतच्या तात्काळ क्रेडिटशिवाय २५० रुपयांपासून १००० रुपयांपर्यंत लोन देईल. हे लोन युजर्सला मोबाईल-DTH रिचार्ज, गॅस सिलेंडर बुकिंग, विज आणि पाणी बिलसारख्या मासिक बिलांचं पेमेंट करण्यासाठी मदत करेल. तसंच ग्राहक पेटीएम पोस्टपेड मिनीसह पेटीएम मॉलवरही खरेदी करू शकतात.

पेटीएम पोस्टपेड सर्विसद्वारे शून्य टक्के व्याजावर ३० दिवसांपर्यंतची ऑफर मिळत आहे. यात कोणतीही वार्षिक फी किंवा अॅक्टिवेशन चार्ज नाही. यात केवळ एक सुविधा शुल्क (convenience fee) भरावं लागेल. पेटीएम पोस्टपेडद्वारे युजर्स देशभरात ऑनलाईन आणि ऑफलाईन मर्चेंट स्टोरवर पेमेंट करू शकतात. Paytm Postpaid देशातील ५५० हून अधिक शहरांत उपलब्ध आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

दरम्यान, डिजिटल इंडिया अभियानाला सहा वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त देशातील आघाडीचा डिजीटल पेमेंट प्लॅटफॉर्म पेटीएमने (Paytm) ग्राहक आणि व्यापार्‍यांसाठी तब्बल ५० कोटी  रुपयांची कॅशबॅक ऑफर आणली आहे. देशाच्या प्रगतीच्या केंद्रस्थानी असलेलं आणि डिजिटल इंडिया अभियान यशस्वी करणाऱ्या व्यापाऱ्यांचा सन्मान करण्यासाठी, त्यांना ओळख मिळवून देण्यासाठी पेटीएमनं ही गॅरंटीड कॅशबॅक ऑफर आणली आहे.

 हे देखील वाचा  :

दिलासादायक! इंग्रजी शाळेच्या फी मध्ये २५ टक्के कपात; मेस्टा संघटनेचा मोठा निर्णय

नवेगाव नागझिरात आढळला काळा बिबट्या; प्रथमच दिसले नर-मादी एकत्र

संपूर्ण फी माफीसाठी AISF चं मुंबई आझाद मैदानावर आंदोलन, विद्यार्थी कार्यकर्त्यांना पोलिसांनी केली अटक

 

Comments are closed.