Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जागतिक नामांकित पोर्टलवर लातूरचे शैलेश रेड्डी यांची तज्ञ सल्लागार पदावर नियुक्ती

मराठवाड्याच्या शिरपेचात रोवला मानाचा तुरा !

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

लातूर, दि. ७ मार्च : ग्रामीण भागातील बेरोजगारांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारे मराठवाड्याचे सुपुत्र शैलेश रेड्डी यांनी गेल्या २० वर्षांपासून महाराष्ट्रातच नव्हे तर देशपातळीवर आपल्या कार्यातून स्वतः ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांनी इव्हेंट या व्यावसायाला ” इव्हेन्ट इंडस्ट्री ” म्हणून मराठवाड्यात सर्व प्रथम ओळख निर्माण करून दिली. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन जागतिक पातळीवर सुविख्यात असलेल्या ” बिझस्टार्ट ” या आंतरराष्ट्रीय व्यावसायिक पोर्टलवर तज्ञ सल्लागार म्हणून शैलेश रेड्डी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.अशा पद्धतीची हि मराठवाड्यातील पहिलीच निवड आहे. या नियुक्तीमुळे मराठवाड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

” बिझस्टार्ट ” कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक हितेश पोरवाल यांनी त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर हि निवड जाहीर केली आहे. जागतिक पातळीवर प्रसिद्ध असलेले ” बिझस्टार्ट ” हे आंतरराष्ट्रीय पोर्टल विविध क्षेत्रातील तरुणांना रोजगार उपलब्ध करून देतात. तसेच नवीन उद्योग उभारणीत मदत करतात. व्यावसायाची निवड, आर्थिक क्षमतेनुसार उद्योग आणि व्यावसायाची उभारणी तसेच त्यासाठी लागणारे तज्ञ मार्गदर्शक मंडळ या पोर्टलवर उपलब्ध आहे. अशा या आंतरराष्ट्रीय पोर्टलवर शैलेश रेड्डी यांची इव्हेन्ट तज्ञ मार्गदर्शक म्हणून नियुक्ती झाल्यामुळे मराठवाड्यातील विविध क्षेत्रातून त्यांचे स्वागत होत आहे.

मराठवाड्यातील इव्हेन्ट इंडस्ट्रीमध्ये माणसांचा योग्य मेळ बसवणारे ” रत्नपारखी ” म्हणून शैलेश रेड्डी ख्यातनाम आहेत. ” टाईमस्क्वेअर इव्हेंट ” या कंपनीच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण भागातील इव्हेंट क्षेत्रात क्रांती केली आहे. लग्न सोहळे व इतर कार्यक्रमात सूत्रबद्धता आणली. सोबतच साउंड, लाईट, डेकोर, स्पेशल इफेक्ट्स, केटरिंग, डॉक्युमेंट्री, शॉर्टफिल्म्स, इंटरनॅशल आर्टिस्ट मॅनेजमेन्ट, सेलेब्रिटी मॅनेजमेन्ट मध्ये त्यांचा हातखंडा आहे. लातूर, उस्मानाबाद, बीड, अहमदनगर, औरंगाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली तसेच कर्नाटकातील गुलबर्गा, बिदर, बसवकल्याण, विजापूर या भागातील तरुणांना उद्योग उभारणीसाठी त्यांनी मोलाची मदत केली आहे. सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक, राजकीय, शैक्षणिक, मनोरंजन क्षेत्रातही इव्हेन्टच्या माध्यमातून त्यांची प्रभावी कामगिरी सुरु आहे. ग्रामीण व शहरी भागातील इव्हेंट व्यवसायाला ” इव्हेन्ट इंडस्ट्री ” म्हणून मराठवाड्यात सर्व प्रथम प्रस्थापित करणारे लातूरचे शैलेश रेड्डी हे सर्वदूर परिचित आहेत. जगातील नामांकित ” बिझस्टार्ट ” या पोर्टलवर शैलेश रेड्डी यांची तज्ञ सल्लागार पदावर नियुक्ती झाल्याबद्दल ग्रामीण भागातील बेरोजगारांना नव्या यशाच्या संधी उपलब्ध होतील अशी आशा निर्माण झाली आहे.

हे देखील वाचा : 

महेश भट्ट आणि पूजा भट्ट यांनी पुण्यात “समर्पण” या व्यसनमुक्ती पुनर्वसन केंद्राची केली स्थापना

तृतीयपंथीशी तरुण लग्नाच्या बंधनात !

 

Comments are closed.