Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

तृतीयपंथीशी तरुण लग्नाच्या बंधनात !

आगळ्या वेगळ्या लग्नाची चर्चा.....

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

तृतीयपंथी सपनाच्या मित्रमंडळींनी ठेका धरला. सपना आणि बाळू मंडपात आले आणि त्यांचा विवाह सोहळा मंगलाष्टका म्हणण्यात आल्या व विवाह च्या सर्व परंपरा पार पाडत ते विवाहबद्ध झाले. खरंतर तृतीयपंथी व्यक्तीचा विवाह होईल अशी अपेक्षाच नव्हती मात्र आज विवाह झाला याचा आम्हाला आनंद असल्याचं बाळू आणि सपना या दोघांनी सांगितलं 

बीड दि,०७ मार्च : बीडमध्ये आगळा वेगळा विवाह सोहळा पार पडला तस समाजामध्ये तृतीयपंथी व्यक्तीकडे पाहण्याचा दृष्टिकोन आजही वेगळाच आहे असं असलं तरी बीडच्या एका तरुण युवक बाळू धुताडमल यानं तृतीयपंथी सपना हिच्याशी विवाहबद्ध झाला काही दिवसापासून बीड सह  राज्यभरात हा विवाह सोहळा होणार असल्याची चर्चा होती आज प्रत्यक्षात हा विवाह सोहळा पार पडला या विवाह सोहळ्याला बीड जिल्ह्यातील प्रतिष्ठीत नागरिकांसह नागरिक मोठ्या संख्येने हजर होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

रीतीरिवाजाप्रमाणे या दोघांचा आज विवाह सोहळा बीड शहरातील कंकालेश्वर मंदिराच्या परिसरामध्ये पार पडला पहिल्यांदाच मनसोक्त पणे तृतीयपंथी सपनाच्या मित्रमंडळींनी ठेका धरला. सपना आणि बाळू मंडपात आले आणि त्यांचा विवाह सोहळा मंगलाष्टका म्हणण्यात आल्या व विवाह च्या सर्व परंपरा पार पाडत ते विवाहबद्ध झाले. खरंतर तृतीयपंथी व्यक्तीचा विवाह होईल अशी अपेक्षाच नव्हती मात्र आज विवाह झाला याचा आम्हाला आनंद असल्याचं बाळू आणि सपना या दोघांनी सांगितलं

या विवाह सोहळ्याला सर्वांनी जणू पाठिंबा दर्शवला आहे असं दिसून आलं या विवाह सोहळ्याला सामाजिक न्याय विभागातील अधिकारी देखील कन्या दानासाठी हजर होते.

 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा ,

महेश भट्ट आणि पूजा भट्ट यांनी पुण्यात “समर्पण” या व्यसनमुक्ती पुनर्वसन केंद्राची केली स्थापना

 

अनैतिक संबंधातून प्रियकराने केला प्रियसीच्या पतीचा खून…

संविधानाने नागरिकांना दिलेल्या अधिकारांचे रक्षण व त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण सर्वजण कटिबद्ध – मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता

Comments are closed.