Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

संपूर्ण फी माफीसाठी AISF चं मुंबई आझाद मैदानावर आंदोलन, विद्यार्थी कार्यकर्त्यांना पोलिसांनी केली अटक

कोरोना काळातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या संपूर्ण फी माफीसाठी ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या मार्फत मुंबई येथील आझाद मैदानावर आंदोलन करण्यात आले

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क, दि. ५ जुलै : कोरोना काळातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या संपूर्ण फी माफी करावी या मागणीसाठी आज ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या (AISF) मार्फत मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्यात आले.

यावेळी त्यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी २९ जून २०१९ रोजी जाहीर केलेली शैक्षणिक शुल्कात सवलत तोकडे आणि अपुरी असल्याचं मत व्यक्त केलं. तसेच विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी विविध मागण्या केल्या. विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर कारवाई करत ताब्यात घेतलंय. विद्यार्थ्यांना डी बी रोड सायबर पोलीस ठाणे येथे ठेवण्यात आले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

एआयएसएफचे राज्याध्यक्ष विराज देवांग म्हणाले, “उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी 29 जून 2019 रोजी जाहीर केलेली शैक्षणिक शुल्कात सवलत तोकडे आणि अपुरी आहे. कोरोनामुळे विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती कमालीची खराब आहे. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारच्या समन्वयाने विद्यार्थ्यांचे संपूर्ण शैक्षणिक शुल्क माफ करण्यात यावे. ओबीसी एससी एसटी विद्यार्थ्यांची फडणवीस सरकारच्या काळात रद्द केलेली फ्रीशिप योजना पूर्ववत करावी. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती परीक्षा त्यांच्या खात्यावर तात्काळ जमा करण्यात याव्यात.”

“या व्यतिरिक्त कोरोना काळातील शैक्षणिक कर्जाचे हप्ते माफ करण्यात यावे, महाराष्ट्र विनाअनुदानित खाजगी शैक्षणिक संस्था प्रवेश शुल्क यांचे नियमन कायदा 2015 यातील विद्यार्थी विरोधी तरतुदी तात्काळ रद्द कराव्या. त्यासंबंधी अध्यादेश काढावा. एमपीएससी परीक्षा तात्काळ घेण्यात याव्यात. तसेच विविध भरती प्रक्रिया राज्यात तात्काळ पूर्ववत कराव्यात. या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन केले,” अशी माहिती विद्यार्थी संघटनेने दिली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

“विद्यार्थी प्रतिनिधी शिक्षण मंत्री उदय सामंत यांची भेट घेणार आहेत. मागण्या मान्य न झाल्यास राज्यभर आंदोलन करून विद्यार्थी व पालकांना संघटित करण्यात येईल,” असा इशारा ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनचे (AISF) राज्याध्यक्ष विराज देवांग व राज्य सचिव प्रशांत आंबी यांनी दिला आहे.

हे देखील वाचा  :

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे परीक्षांबाबत होणाऱ्या विलंबाच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन

दिलासादायक! इंग्रजी शाळेच्या फी मध्ये २५ टक्के कपात; मेस्टा संघटनेचा मोठा निर्णय

नवेगाव नागझिरात आढळला काळा बिबट्या; प्रथमच दिसले नर-मादी एकत्र

 

 

Comments are closed.