Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे परीक्षांबाबत होणाऱ्या विलंबाच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

पुणे डेस्क, दि. ५ जुलै : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे परीक्षांबाबत होणाऱ्या विलंबाच्या विरोधात आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तर्फे एमपीएससीच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात आले.

यावेळी मोठया संख्येने MPSC परीक्षा देणारे विद्यार्थी या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. एमपीएससीतर्फे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. पूर्व व मुख्य परीक्षा पास होऊन दीड वर्ष झाले तरी मुलाखतीसाठी एमपीएससी तर्फे कोणतेही आश्वासन देण्यात आले नाही. त्यामुळे स्वप्निल लोणकर यांनी आत्महत्या केली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

विद्यार्थी आपल्या कुटुंबाला आधार देण्यासाठी एमपीएससी द्वारे परीक्षा देत असतात एमपीएससी द्वारे विद्यार्थ्यांच्या पदरात निराशाच पडत आहे.

महाराष्ट्रातून विविध गावामधून आणि शहरांमधून लाखो विद्यार्थी वर्षानुवर्षे अभ्यास करीत आहेत. परंतु कमी जागांची भरती परीक्षांसाठी होणारा विलंब उत्तीर्ण होऊन देखील नोकरीमध्ये रुजू न करणे अशा अनेक समस्यांमुळे सरकारच्या नाकर्तेपणामुळे विद्यार्थी हैराण झाले आहेत. अशा व अनेक मागण्यांचे निवेदन यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तर्फे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांना देण्यात आले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :

दिलासादायक! इंग्रजी शाळेच्या फी मध्ये २५ टक्के कपात; मेस्टा संघटनेचा मोठा निर्णय

नवेगाव नागझिरात आढळला काळा बिबट्या; प्रथमच दिसले नर-मादी एकत्र

विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये प्रचंड धक्काबुक्की, भाजपच्या 12 आमदारांचं एका वर्षासाठी निलंबन

Comments are closed.