Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

दिलासादायक! चंद्रपूर जिल्ह्यात आज कोरोनाबाधित मृत्युचा आकडा शुन्यावर, 26 कोरोनामुक्त तर 20 जण पॉझिटिव्ह

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

चंद्रपूर, दि.10 जुलै : गत काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाबाधित मृत्युचा आकडा शुन्यावर आला असून जिल्ह्यासाठी ही दिलासादायक बाब आहे. तसेच 24 तासात जिल्ह्यात 26 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तर 20 जण नव्याने पॉझिटीव्ह आले आहेत. जिल्हयात शनिवारी एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही.

आरोग्य विभागाच्या प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या 20 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 4, चंद्रपूर तालुका 2, बल्लारपूर 5, भद्रावती 2, ब्रम्हपुरी 1, नागभीड 0, सिंदेवाही 0, मुल 1, सावली 0, पोंभूर्णा 1, गोंडपिपरी 0, राजूरा 1, चिमूर 0, वरोरा 2, कोरपना 0, जिवती 0 व इतर ठिकाणच्या 1 रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 84 हजार 812 वर पोहोचली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 83 हजार 118 झाली आहे. सध्या 161 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 5 लाख 78 हजार 300 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 4 लाख 90 हजार 86 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1533 बाधितांचे मृत्यू झाले आहे.

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :

जगातील अनेक देशांमध्ये डेल्टा व्हायरसचं आक्रमण! कोरोनाचं आव्हान संपलेलं नसल्याचा WHO ने दिला इशारा

रेमेडेसिव्हिर इंजेक्शनचा काळाबाजार; तीन आरोपींचा जामिन अर्ज कोर्टाने नाकारला

दोन वर्षाच्या चिमुकलीसोबत आईने विहिरीत उडी घेऊन संपवली जीवनयात्रा

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.