Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

दोन वर्षाच्या चिमुकलीसोबत आईने विहिरीत उडी घेऊन संपवली जीवनयात्रा

मृत्यूचे कारण अजूनही गुलदस्त्यात.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील कान्होली गावच्या महिलेने दोन वर्षाच्या चिमुकलीला घेऊन  शेतशिवारात असलेल्या विहिरीमध्ये  उडी घेऊन जीवनयात्रा संपविल्याने मोठी खळबळ माजली आहे.

मृतक महिलेचे नाव सुरभी प्रणीत बारसागडे (२५) तर  मृत चिमुकलीचे नाव त्रिशा प्रणीत बारसागडे ही दोन वर्षाची आहे. दिनांक ५ जुलै रोजी सोमवारला आपल्या राहत्या घरुन मुलीचे आधारकार्ड काढण्याकरिता भेंडाळा येथे जात आहे, असे घरच्या पतीला आणि परिवाराला सांगून भेंडाळा येथे निघाली होती. मात्र मृतक आई आणि चिमुकली सायंकाळपर्यंत घरी न आल्याने परिवाराकडून शोधाशोध सुरु करण्यात आले. आजूबाजूच्या गावातही विचारणा करण्यात आली. आप्त नातेवाईकांना फोन करून विचारपुस केले असता पत्नी चा व मुलीचा कुठेच थांगपत्ता लागला नसल्याने दुसऱ्याच दिवशी ६ जुलै रोज मंगळवार ला थेट चामोर्शी पोलीस स्टेशन गाठले व घडलेल्या घटनेची माहिती देत पोलीस ठाण्यात पत्नी व मुलगी लापता असल्याची रितसर तक्रार दिली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

तक्रारीची लगेच पोलिसांनी दखल घेत शोध राबविली असता त्यांना आज दिनांक १० जुलै २०२१ रोजी दुपारच्या सुमारास अज्ञात दोन मृतदेह भेंडाळा हद्दीच्या शेतातील विहीरीत असल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक शेवाळे, स.पो.नी नागनाथ पाटील, पो. उप. नि. निशा खोब्रागडे, पो.ह.चंद्रशेखर गंमपलवार,पो.ह.लाकडे,पो.शि.ऊईकेव इतर कर्मचारी वर्गाने घटना स्थळ गाठले.

त्यावेळी विहीरीत सडक्या अवस्थेत असलेल्या मृतदेह आढळून आल्याने पंचनामा करून ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय चामोर्शी येथे पाठविण्यात आले असून भांदवी कलम ३०२ अन्वये गुन्हा नोंद करीत पुढील तपास पोलीस निरीक्षक शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निशा खोब्रागडे, पो.ह. गंम्पलवार व इतर पो. कर्मचारी  करीत आहेत. सदर घटनेची माहिती होताच कान्होली गावात तसेच आजूबाजूच्या परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :

उखर्डा ते नागरी रस्ता तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू – अभिजित कुडे

“त्या” अवैध दारू विक्रेता, सावकारापुढे पोलीस यंत्रणा हतबल ठरतेय का?

नाल्यात वाहून दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू; नाला ओलांडण्याचे धाडस बेतले जीवावर

 

 

Comments are closed.