Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

दिलासादायक ! गडचिरोली जिल्ह्यात 363 कोरोनामुक्त तर 8 मृत्यूसह 180 नवीन कोरोना बाधित

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. 20 : आज जिल्हयात 180 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 363 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 28158 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 25384 वर पोहचली. तसेच सद्या 2117 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत.

आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 657 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. आज 8 नवीन मृत्यूमध्ये 65 वर्षीय पुरुष चपलवाडा ता. चामोर्शी, 32 वर्षीय पुरुष कान्हाळगांव ता. सिंदेवाही जि. चंद्रपूर, 55 वर्षीय पुरुष दिघोरीमोठी ता. लाखांदूर जि. भंडारा, 53 वर्षीय पुरुष डोगरगांव ता. सिंदेवाही जि.चंद्रपूर, 25 वर्षीय पुरुष अहेरी, 85 वर्षीय महिला सर्वोदय वार्ड, गडचिरोली, 70 वर्षीय महिला राजंनगट्टा ता. चामोर्शी, 57 वर्षीय पुरुष गोकुल नगर गडचिरोली,यांचा नवीन मृत्यूमध्ये समावेश आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 90.15 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 7.52 टक्के तर मृत्यू दर 2.33 टक्के झाला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

नवीन 180 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 38, अहेरी तालुक्यातील 19, आरमोरी 11, भामरागड तालुक्यातील 05, चामोर्शी तालुक्यातील 30, धानोरा तालुक्यातील 10, एटापल्ली तालुक्यातील 04, कोरची तालुक्यातील 02, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 03, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 21, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 22 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 15 जणांचा समावेश आहे.

तर आज कोरोनामुक्त झालेल्या 363 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 90, अहेरी 48, आरमोरी 40, भामरागड 07, चामोर्शी 51, धानोरा 11, एटापल्ली 14, मुलचेरा 34, सिरोंचा 26, कोरची 03, कुरखेडा 18 तसेच वडसा येथील 21 जणांचा समावेश आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :

जिल्हयात लसीकरणासाठी प्रशासनाची नाविण्यपुर्ण रणनीती

ICMRचा महत्त्वाचा निर्णय ; आता घरच्या घरी कोरोना अँटिजेन टेस्ट करता येणार

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.