पृथ्वीबाबा-विलासकाका उंडाळकर यांची दिलजमाई.कट्टर विरोधक एकत्र आल्याने सातारा काँग्रेसची ताकद वाढणार..
काँग्रेस पक्षात असून देखील एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले माजी मंत्री विलास काका उंडाळकर आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची दिलजमाई झाली आहे.
लोकस्पर्श न्यूस नेटवर्क
मुंबई डेस्क :राष्ट्रीय कॉग्रेस अंतर्गत कट्टर विरोधक माजी मंत्री विलास काका उंडाळकर व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण एकत्र येणार असुन विलास काका उंडाळकर यांचे पुत्र उदयसिंह पाटील हे कॉग्रेस मध्ये सक्रिय होणार आहेत .
कराडमध्ये माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण आणि माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांच्यातील दरी कमी झाली आहे. त्यामुळे मध्यंतरी आमदार चव्हाण यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री उंडाळकर यांची त्यांच्या सातारा येथील राजविलास या बंगल्यात जाऊन भेट घेतली. त्यामुळे टोकाच्या संघर्षाचा अंत झाला. त्यानंतर आता पुढचे पाऊल म्हणुन कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसुलमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार चव्हाण आणि उंडाळकर यांचे पुत्र अॅड. उदयसिंह पाटील यांची मुंबईत नुकतीच बैठक झाली. त्यामध्ये अॅड. पाटील यांना कॉंग्रेसच्या राज्यस्तरीय समितीत सक्रीय करण्यावर शिक्कोर्तब झाले. त्यामुळे जिल्ह्यात कॉंग्रेस बळकट होण्यास मदत होणार आहे.
राजकीय संघर्षातुन चव्हाण आणि उंडाळकर गटात नेहमीच मोठी चुरस पहायला मिळाली आहे. माजी मुख्यमंत्री आमदार चव्हाण यांचे आई-वडील खासदार होते. त्यानंतर ते खासदार झाले. त्या काळातील राजकीय संघर्षातुन विलासराव पाटील-उंडाळकर हे बाजुला होवुन त्यांनी स्वतंत्र गट स्थापन केला. त्यामाध्यमातुन त्यांनी कराड दक्षिण मतदार संघाचे आमदार म्हणुन नेतृत्व करत असतानाच त्यांना सहकार, दुग्धविकास, पशुसंवर्धन, मदत व पुनर्वसन खात्याच्या कॅबीनेट मंत्रीपदाची संधी मिळाली तर पृथ्वीराज चव्हाण हे दिल्लीत पंतप्रधान कार्यालयाचे मंत्री म्हणुन काम पहत होते. त्यामुळे ते दिल्लीत आणि उंडाळकर राज्यात आपला बकुब राखुन होते.
त्यानंतर मध्यंतरी आमदार चव्हाण व गृह राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांनी उंडाळकर यांची त्यांच्या सातारा येथील राजविलास या बंगल्यात जाऊन भेट घेतली. माजी मुख्यमंत्री आमदार चव्हाण यांनी पहिल्यांदाच उंडाळकर यांची घरी जाऊन भेट घेतल्याने या भेटीला मोठे महत्त्व प्राप्त झाले होते. त्यानंतर नुकतीच कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसुलमंत्री थोरात, आमदार चव्हाण आणि अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांची मुंबईत बैठक झाली. त्यामध्ये अॅड. पाटील यांना कॉंग्रेसच्या राज्यस्तरीय समितीत सक्रीय करण्यावर शिक्कोर्तब झाले. त्यामुळे जिल्ह्यात कॉंग्रेस बळकट होण्यास मदत होणार आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण मंत्री बंटी पाटील व उंडाळकर यांच्या उपस्थितीत शुक्रवारी 6 रोजी कराडला होणाऱ्या मेळाव्यात दोन्ही गट एकत्र आल्यामुळे सातारा जिल्ह्यात काँग्रेस बळकट होण्यास मदत होईल..
Comments are closed.