Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

युवकांनी उद्योग उभारून आत्मनिर्भर व्हावे .धानोरा येथे हॉटेल मॅनेजमेंट प्रशिक्षण केंद्राचे उदघाटन कर्यक्रमात खा. अशोक नेते यांचे प्रतिपादन.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली – दि. 2 नोव्हें:- सुशिक्षित बेरोजगार युवकांची संख्या दिवसानदिवस वाढत असून आज सर्वाना नौकरी मिळविने  सोपे  नाही त्यामुळे युवकांनी विविध विषयांचे  प्रशिक्षण घेऊन  आत्मनिर्भर होण्यासाठी स्वतः उद्योग निर्माण करुन खेड्यापाड्यातील  युवकांनाही रोजगार उपलब्ध करून द्यावा जेणेकरून गावाचा विकास होईल असे प्रतिपादन धानोरा येथिल हॉटेल मॅनेजमेंट प्रशिक्षण केंद्राच्या उदघाटन कार्यक्रमा प्रसंगी युवकांना मार्गदर्शन करताना केले .

कौशल विकास व व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ ,मुंबई व धनश्री मल्टीपर्पज सर्व्हिसेस पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने अधिकृत प्रशिक्षण केंद्र धानोरा येथील रुरल सिटीझन डेव्हलपमेंट संस्थेच्या वतीने हॉटेल मॅनेजमेंट प्रशिक्षण केंद्राचे उदघाटन खासदार अशोक नेते यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून धानोराच्या नगराध्यक्ष लीनाताई साळवे, जिप च्या समाज कल्याण सभापती रंजिताताई कोडाप, जिप सदस्या लताताई पुघाटे, पं स सभापती अनुसयाताई पोरेटी, भाजपा च्या माजी जिल्हाध्यक्ष ताराबाई कोटांगले, गडचिरोली च्या महिला आघाडी शहराध्यक्ष पल्लवीताई बारापात्रे, तालुका महामंत्री विजयजी कुमरे, भाजपचे ज्येष्ठ नेते साईनाथजी साळवे, ज्येष्ठ नेते गुंडांवार जी , बाळू उंदिरवाडे, सुभाष धाईत, अनुसूचित जाती मोर्चा चे जिल्हा महामंत्री जनार्धनजी साखरे, अल्पसंख्याक मोर्चा चे जिल्हा महामंत्री जावेदअली सय्यद,संदीप रामटेके, सारंग साळवे, उमेश सरदार उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Comments are closed.