Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अवैधरीत्या रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या धडकेत सायकलस्वार ठार.

Get real time updates directly on you device, subscribe now.

शव उचलण्यास गावकऱ्यांचा नकार. चक्काजाम केल्याने गावात तणावाचे वातावरण.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:

चंद्रपुर दि. १२ नोव्हेंबर: अवैधरित्या रेतीची वाहतूक करीत असलेल्या ट्रॅक्‍टरने सायकल ने जात असलेल्या युवकास धडक दिल्याने जागीच मृत्यू झाला. मृतक युवकाचे नाव उमेश सोनुर्ले (१६) असून ११ वी चे शिक्षण घेत असल्याची प्राथमिक माहिती आहे. ही घटना राजुरा तालुक्यातील विहीरगावातील आहे.  

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मृतकाचे वडिल पुंडलिक सोनुर्ले यांनी मृतक उमेश याला शेतात बॅटरीचे करंट बंद करण्याकरिता सकाळी ६.३० च्या दरम्यान सायकलने पाठविले. उमेश शेताचे काम आटोपून परत येत असतांना गावाच्या सीमेवर अवैध रेती उत्खनन करून भरधाव जाणाऱ्या ट्रॅक्टरने चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर ट्रॅक्टर चालक व मजूर ट्रॅक्टर सोडून पसार झाले. या घटनेची माहिती होताच परिवारासह नातेवाईकांनी घटनास्थळी दाखल होऊन मोठा टाहो फोडला. गावातील संपूर्ण नागरिक एकत्र येऊन जेव्हापर्यंत ट्रॅक्टर मालकावर गुन्ह्याची नोंद होत नाही तोपर्यंत मृतकाचे शव उचलणार नाही असा पवित्रा घेत घटनेच्या ठिकाणी चक्काजाम करण्यात आले. त्यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून गावात शोककळा पसरली आहे. परिवारातील कर्ता युवकाचा मृत्यू झाल्याने मोठे आभाळ कोसळले आहे. राजुरा पोलीसांना माहिती होताच घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरु आहे.  

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.