Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जिल्हा सामान्य रुग्णालय उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मानित

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली, दि. 03  फेब्रुवारी : राजीव गांधी जिवनदायी आरोग्य योजना हि गडचिरोली जिल्हात दिनांक 2 जुलै 2012 पासुन सुरु असुन सदर योजनेचे नाव 1 एप्रिल 2017 पासुन महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना असे ठरविण्यात आले व त्याच सोबत दिनांक 23 सप्टेंबर 2018 रोजी पासुन प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही सुरु करण्यात आलेले आहे. गडचिरोली जिल्हात 1 एप्रिल 2020 पासुन एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व पासुन आयुषमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही सुरु आहे.
तरी सदर योजनेअंतर्गत पिवळे, केसरी अंतोदय व अन्नपुर्णा शिधापत्रिका धारक कुटुंबे पात्र लाभार्थी आहेत.

आयुषमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे गोल्डन कार्ड धारक व्यक्ती योजनेचे पात्र लाभार्थी आहेत. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत प्रति वर्ष प्रति कुटुंब रुपये 1.50 व आयुषमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत रुपये 5 लाखांपर्यंतचे आरोग्य विमा संरक्षण देणे अनुज्ञेय असुन या योजनेअतंर्गत एकुण 1209 शस्त्रक्रिया/औषध-उपचारांचा समावेश करण्यात आलेला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिराली येथे 2 जूलै 2012 पासुन 5230 ईतक्या रुग्णांवर उपचार/ शस्त्रक्रिया करण्यात आलेले आहे. व सन 2022-23 या वर्षात 930 इतक्या रुग्णांवर उपचार/शस्त्रक्रिया करण्यात आलेले आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली यांची जिल्हातील उत्कृष्ट कामगीरी केल्याबद्दल योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, मुंबई व जिल्हाधिकारी गडचिरोली यांचे तर्फे 26 जानेवारी 2023 रोजी प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉ.अनिल जे. रुडे,जिल्हा शल्य चिकित्सक, डॉ.सतिशकुमार सोलंकी, अति.जिल्हा शल्य चिकित्सक, डॉ.बागराज धुर्वे, निवासी वैद्यकिय अधिकारी, डॉ. माधुरी किलनाके, शल्य चिकित्सक, संजय महेशगौरी, प्रशासकिय अधिकारी, डॉ.गायत्री तुमडे, वैद्यकिय समन्वयक, गणेश मानकर, लेखापाल व मंगेश नैताम, संगणक परीचालक सामान्य रुग्णालय, गडचिरोली यांची उपस्थिती होती. तरी गडचिरोली जिल्हयातील नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा.योजनेतील आरोग्य मित्र अथवा 07132 299046 किवा 155388 किंवा 18002332200 या टोल फ्रि क्रमांकावर संपर्क साधावा.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

सार्वजनिक आरोग्य विभागातील एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत नव्याने अंगीकृत केलेल्या रुग्णालयांची नावे पुढील प्रमाणे आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली, जिल्हा महिला व बाल रुग्णालय, गडचिरोली, उपजिल्हा रुग्णालय, आरमोरी, उपजिल्हा रुग्णालय, कुरखेडा, उपजिल्हा रुग्णालय, अहेरी,ग्रामिण रुग्णालय, चामोर्शी, धन्वतरी हॉस्पिटल ॲण्ड क्रिटीकल केअर, गडचिरोली, सीटी हॉस्पिटल ॲण्ड क्रिटीकल केअर, गडचिरोली,सींधु आर्थोपेडीक हॉस्पिटल गडचिरोली, लोक बिरादरी रुग्णालय, हेमलकसा, भामरागड असे जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. अनिल रुडे यांनी कळविले.

हे देखील वाचा : 

कलाविश्वाला मोठा धक्का; प्रसिद्ध दिग्दर्शक के विश्वनाथ यांचं निधन

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.