Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

उद्योगपती सायरस मिस्त्री अपघात प्रकरणात चालक अनहिताच्या पतीचा अखेर नोंदविला जबाब

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

पालघर,  04 नोव्हेंबर :- उद्योगपती सायरस मिस्त्री अपघात प्रकरणात चालक अनहिता पंडोले यांच्या पतीचा अखेर दोन महिन्यांनंतर पालघर पोलिसांनी जबाब नोंदवला आहे. चारोटी येथील सूर्या नदीच्या पुलावर तीन लेनच्या अचानक दोन लेन झाल्याने आणि समोर वाहन असल्याने अनहिता यांना गाडी कंट्रोल न करता आल्याने हा अपघात झाल्याचं डेरिअस यांनी आपल्या जबाबात सांगितलं आहे. चालक अनहीता यांचे पती डेरिअस पंडोले हे देखील या अपघातात जखमी झाले होते. त्यामुळे त्यांच्या मुंबई येथील घरी जाऊन जव्हार डीवायएसपी प्रशांत परदेशी यांनी हा जबाब नोंदवला आहे. चालक अनाहिता यांच्यावर अजूनही उपचार सुरू असल्याने त्यांचा जबाब पोलिसांना नोंदवता आलेला नाही.

टाटा सन्सचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री यांचा गुजरातहून मुंबईकडे येत असतांना अपघात झाला होता. या अपघातात सायरस मिस्त्री आणि जहांगीर पंडोले यांचा जागीच मृत्यू झाला होता तर अनहिता पंडोले आणि त्यांचे पती डेरियस पंडोले जखमी झाले होते. अपघाताच्या वेळी मुंबईतील प्रसिध्द स्त्रीरोगतज्ञ अनहिता पंडोले या कार चालवत होत्या. या प्रकरणात आता दोन महिन्यानंतर त्यांचे पती डेरियस पंडोले याचा जबाब पोलिसांनी नोंदविला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

उद्योगपती सायरस मिस्त्री अपघात प्रकरणात चालक अनहिता पंडोले यांच्या पतीने पालघर पोलीसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, चारोटी येथील सुर्या नदीच्या पुलावर तीन लेनच्या अचानक दोन लेन झाल्याने आणि समोर असलेले वाहन यामुळे अनहिता यांना गाडीवर नियंत्रण ठेवता आले नाही आणि मर्सिडीजचा अपघात झाला. चालक अनहिता पंडोले यांचे पती डेरियस पंडोले यांनी डीवायएसपी जव्हार यांच्याकडे जबाब नोंदविला आहे.

हा अपघात झाला तेव्हा सायरस मिस्त्री आणि जहांगीर पंडोले कारच्या मागच्या सीटवर बसले होते तर अनहिता पंडोले आणि डेरियस पंडोले पुढे बसले होते. या प्रकरणी पोलिसांनी माहिती देतांना सांगितले होते की, मागे बसलेले मिस्त्री आणि जहांगीर पंडोले या दोघांनीही सीट बेल्ट लावला नव्हता. मर्सिडीजने मुंबई पासून 120 किमी अंतरावर असलेल्या पालघरमधील चारोटी चेकपोस्ट पार केल्यानंतर 9 मिनीटांत 20 किमी अंतर कापले होते. म्हणजेच गाडीचा वेग ही जास्त होता.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे पण वाचा :-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.