Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

ट्रकला राज्यात प्रवेशासाठी 500 रु. एन्ट्री फी भोवली, चंद्रपूरच्या सहायक मोटर वाहन निरीक्षकाला 500 ची लाच घेताना अटक

लंगाणा सीमेवरच्या लक्कडकोट नाक्यावर अमरावती एसीबीची कारवाई

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

चंद्रपूर :-  राज्याच्या सीमा अन्य राज्याला जोडणाऱ्या महामार्गांवर महाराष्ट्र परिवहन विभागाचे चेक पोस्ट आहेत. हे चेक पोस्ट म्हणजे परिवहन विभागासाठी वसुलीचे केंद्र बनल्याची चर्चा होत असते. मात्र चंद्रपुरात याच नाक्यावर तैनात असलेल्या सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकाला अमरावती एसीबीच्या पथकाने 500 रुपये लाच घेताना अटक केली आहे.

महाराष्ट्र -तेलंगणा सीमेवरच्या चंद्रपूर जिल्ह्यातील लक्कडकोट येथे हा सीमा तपासणी नाका आहे. या ठिकाणी शिवाजी विभुते हे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक आपल्या खाजगी एजंटसह तैनात होते. आदिलाबाद -चंद्रपूर दरम्यान ट्रान्सपोर्ट करणाऱ्या एका इसमाने वजन व कागदपत्रे बरोबर असतानाही आपल्याकडून अवैध वसुली केली जात असल्याची तक्रार अमरावती एसीबीला केली होती. त्यानुसार एसीबीने सापळा रचत शिवाजी विभुते व त्याचा खाजगी एजंट जगदीश डफडे याला अटक केली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

दरम्यान विभुते यांच्या कर्तव्यकाळात नाक्यावर 56 हजार 100 रुपयाची रोख रक्कम आढळून आली. याबाबत कुठलाही समाधानकारक खुलासा शिवाजी विभूते करू शकले नाहीत. त्यामुळे ती रक्कम ताब्यात घेण्यात आली आहे. 500 रुपयांच्या एन्ट्री फीच्या लोभापायी सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक मात्र पुरता जाळ्यात अडकला आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.