नवीन तूर येण्याआधीच बाजारातील तुरीचे भाव ३ हजार रुपयांनी पडले.
महिनाभरानंतर नवीन तुरीची होणार आवक
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली : जिल्ह्यात सर्वाधिक उत्पादन धान पिकाचे घेतले जाते. यावर्षी सर्वाधिक लागवड धान पिकाची केली असून काही शेतकरी शेतीच्या बांधावरच तुरीचे उत्पादन घेतात. जिल्ह्यातील ९८ टक्के शेतकरी शेतीच्या बांधावरच जुलै-ऑगस्ट महिन्यात तुरीची लागवड करतात.
२०२४-२५ या खरीप हंगामात जिल्ह्यात एकूण ६ हजार हेक्टर क्षेत्रावर तुर पिकाची लागवड करण्यात आली आहे. सध्या हलक्या तुरीच्या शेंगा बाजारात येत आहेत, तर अधिक मुदतीच्या तुरी फुलोरा अवस्थेत आहेत. शेतकऱ्यांच्या घरी तुरी येण्यास आणखी महिनाभराचा कालावधी शिल्लक असून काही दिवसाच्या आधी बाजारात तुरीचे दर ११ हजार रुपयांच्या वर गेलेले होते. मात्र, हेच दर आता घसरलेले असून जिल्ह्यात खुल्या बाजारात सध्या तुरीला ८ हजार रुपयांचा दर मिळत आहे. तीन हजार रुपयांहून अधिक किंमत व्यापाऱ्यांनी घटवलेली आहे.
रोजच्या दैनदिन आहारात वरण हे आवडीचे आहे. त्यामुळे तुरीच्या डाळीची पर्यायाने तुरीला मागणी असते. शेतकरी विविध प्रकारच्या डाळी शेतात लावत असतात. जिल्ह्याच्या विविध प्रकारच्या डाळी होते. या वातावरणामुळे तूर पिकाच्या मोहोरावर विपरीत परिणाम झाला. मोहोर जळाला तसेच पिकावर २ कीड व रोगाचा प्रादुर्भाव झाला. अशा वातावरणामुळे तुरीचे उत्पादन घटण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. ७,५५० रुपये प्रतिक्विंटल तुरीला हमीभाव केंद्र शासनाच्या आधारभूत खरेदी किंमत योजनेंतर्गत २०२४-२५ या हंगामासाठी तुरीला प्रतिक्चिटल ७ हजार ५५० रुपये हमीभाव आहे. खुल्या बाजारात मागील वर्षीसुद्धा तूर ८ हजार रुपये प्रतिक्विंटल दरानेच खरेदी झालेली होती. तुरीचे उत्पादन हाती आल्यानंतर प्रत्यक्ष किती दर मिळतो याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
हे ही वाचा,
बहिणीचा विनयभंग केला म्हणून भावाने आरोपीचा प्रायव्हेट पार्ट कापला, गळा चिरून केली हत्या;
Comments are closed.