Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मंत्रीपद गेलं तरी चालेल पण ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावू देणार नाही : विजय वडेट्टीवार

Get real time updates directly on you device, subscribe now.

विजय साळी, लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

जालना, दि. ५ डिसेंबर : मंत्रीपद गेलं तरी चालेल पण ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावू देणार नसल्याचं काँग्रेस नेते आणि मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे. विजय वडेट्टीवार हे औरंगाबाद वरून नागपूर येथे जात असताना जालना येथे थांबले होते त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. मराठा आरक्षणामुळे ओबीसी समाजाला धक्का लागेल, अशी भीती काही ओबीसी नेत्यांना वाटत आहे. यावर बोलतांना त्यांनी प्रतिक्रिया दिली की, आम्ही पूर्ण ताकदीनिशी मराठा समाजाबरोबर आहोत. मात्र आम्हाला ओबीसी समाजामधून आरक्षण द्या म्हणणे पूर्ण चुकीचं आहे. जर असा प्रयत्न झालाच तर मंत्री पद गेलं तरी चालेल पण ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नसल्याचं विजय वडट्टीवार यांनी म्हटलं आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील करमाड येथे ओबीसी समाजाचे पहिले मराठवाडास्तरीय अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनाला विजय वडेट्टीवार यांची उपस्थिती होती.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

ओबीसी मेळाव्यात बोलताना वडेट्टीवार यांनी म्हटलं की, ओबीसी आरक्षणाला कोण हात लावतो ते पाहू. विजय वड्डेटीवार जिवंत आहे तोवर धक्का लावायचा विषय नाही. वाटेल ते काय काढायचं असेल तर काढू आपल्याकडे घोंगड आहे आणि काठी पण आहे. कोणाला कितीही देऊ द्या पण आमच्या हक्काचं नको. आमच्या वाट्याचं आरक्षण देऊ नका. आमच्या वाट्याला धक्का लावू नका, ही आमची विनंती आहे.

कार्यालयीन वेळेत खेळ रंगला क्रिकेटचा.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.