Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पर्यटन स्थळांवर जाण्यास बंदी असताना देखील नागरिकांची …या धबधब्यावर प्रचंड गर्दी

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

ठाणे : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा म्हणून ठाणे जिल्हाधिकारी यांनी पर्यटन स्थळ, पिकनिक पॉईंट, धबधबे व किनारपट्टी या ठिकाणी पर्यटकांना बंदी घातली आहे, असे असतांना नागरिक मात्र सुधारणेचे नाव घेत नाही,  असेच चित्र पाहायला मिळाले ठाण्यातील मुब्रा बायपास वरील धबधब्यावर. पर्यटकांनी २७ जून रोजी या धबधब्यावर प्रचंड गर्दी केली होती.

ठाण्यातील मुंब्रा येथे मुंब्रा देवी डोंगरावर अतिशय नयनरम्य अशा धबधब्याकडे तिथून जाणारे सर्व जण नेहमी आकर्षित होत असतात, एवढंच नाही तर पावसाळ्यात दररोज विशेष करून सुट्टीच्या दिवशी आणि रविवारी या धबधब्यावर पर्यटक प्रचंड गर्दी करतात. पण सध्या कोरोनाचा काळ असल्यामुळे राज्यात कलम १४४ म्हणजेच जमावबंदीचा आदेश लागू आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

शिवाय ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी जारी केलेल्या आदेशानुसार ठाण्यातील सर्वच धबधबे, नद्या, तलाव आणि पर्यटन स्थळे या सर्वच ठिकाणी नागरिकांना जाण्यास मनाई करण्यात आलेली आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

असं असताना देखील मुंब्र्यातील मुंब्रा बायपास वरील मुंब्रा देवी डोंगरातील धबधब्यावर आजही पर्यटकांची प्रचंड गर्दी असून या धबधब्याचा आनंद घेत आहेत, धक्कादायक म्हणजे या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळले जात नसून, एकाही नागरिकाने मास्क घातलेला नाही. यामुळे मुंब्र्यात जमावबंदीचे आदेश किंवा पर्यटनस्थळांवर जाण्यास मनाई आदेश लागू होत नाही का? असा देखील प्रश्न निर्माण होतोय.

एकीकडे डेल्टा प्लस या कोरोनाच्या नवीन व्हायरसमुळे अनेक ठिकाणी पुन्हा कडक निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत. त्यात ठाणे जिल्हा देखील असून मुंब्रा शहर देखील आहे. असे असताना या धबधब्यावर लोकांची गर्दी होवून देखील मुंब्रा पोलिसांनी याठिकाणी साधी भेट दिली नाही. कारवाई करणे तर लांबच. जर अशा पद्धतीने नागरिक कायदा मोडून महामारीच्या काळात एकत्र जमत असतील आणि कोरोना संदर्भातले कोणते नियम पाळत नसतील तर कोरोना कधीच संपणार नाही याचं हे जिवंत उदाहरण आहे.

हे देखील वाचा :

धक्कादायक!! एकाच महिलेला एकाच वेळी दिले कोरोना लसीचे तीन डोस!

कमलापूर परिसरातील विविध मागण्यासाठी रेपनपल्ली येथे ४ जुलै ला रास्ता रोको आंदोलन

सिंदेवाहीत जबरान जोत शेतकर्‍यांचा एल्गार; राजु झोडे यांच्या नेतृत्वात शेतकर्‍यांचे धरणे आंदोलन

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.