Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

धक्कादायक!! एकाच महिलेला एकाच वेळी दिले कोरोना लसीचे तीन डोस!

ठाणे महापालिकेच्या लसीकरण केंद्रावरील धक्कादायक प्रकार.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

ठाणे :  महापालिकेच्या आनंद नगर लसीकरण केंद्राकर अजब प्रकार उघडकीस आला आहे. लस घेण्यासाठी गेलेल्या २८ वर्षीय महिलेला एकाच वेळी लसीचे तीन डोस दिले असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

दरम्यान महिलेची प्रकृती स्थिर असून पालिका डॉक्टरांच्या निग्रनीखाली ठेवण्यात आली असून आरोग्य केंद्राकवरच्या अश्या निष्काळजी कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी विरोधकांनी केली आहे. याबाबत समिती नेमली असून आम्ही चौकशी करत आहोत, असं उत्तर पालिका प्रशासनाने दिलं आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

ठाण्यातील घोडबंदर रोड येथे असलेल्या आनंद नगर आरोग्य केंद्रावर २५ जून रोजीच्या दुपारच्या सुमारास धक्कादायक प्रकार घडला आहे. कोविड-१९ प्रतिबंधात्मक लस घेण्यासाठी ब्राम्हड येथे राहणारी एक महिला या आरोग्य केंद्रावर गेली, याच वेळी केंद्रावर उपस्थित असणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी या महिलेला तब्बल एक नव्हे तर तीनदा लस दिली असल्याचा प्रकार घडला होता. एकाच वेळी तीन डोस दिल्याने ही महिला घाबरली आणि घरी परतली. आपल्यासोबत झालेला संपूर्ण प्रकार तिने आपल्या पतीला सांगितले.

दरम्यान या संदर्भात पालिका अधिकाऱ्यांना विचारले असता असा कोणताही प्रकार झाला नसल्याचे सांगण्यात आले, तर जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न ठाणे महापालिकेचे अधिकारी आणि डाँक्टरने करत असल्याचा आरोप भाजपचे गटनेते मनोहर डुंबरे यांनी केला असून लस देण्यासाठी उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

या घटनेत लसीचे तीन डोस देण्यात आले असताना देखील पालिका प्रशासन तोंडावर बोट ठेवत आहे, मात्र या प्रकारामुळे पालिकेचा निष्काळजीपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून चौकशी करून संबंधितावर कारवाई केली जाईल असे महापौर नरेश म्हस्के यांनी स्पष्ट केले आहे.

हे देखील वाचा :

कमलापूर परिसरातील विविध मागण्यासाठी रेपनपल्ली येथे ४ जुलै ला रास्ता रोको आंदोलन

झेंडेपार येथील प्रस्तावित लोहप्रकल्पासाठी अर्ज धारकांना दिलेली भु-प्रवेशाची परवानगी रद्द करण्याची ग्रामसभेची निवेदनाद्वारे केली मागणी

…या महिन्यात सुरु होऊ शकतात महाविद्यालये – उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली माहिती

 

Comments are closed.