Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

विधानसभेत छातीठोक सांगितलं, पण प्रत्यक्षात शार्जिलबाबत काय केलं? फडणवीसांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सवाल

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क, दि. १६ मार्च: माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. विधानसभेत छातीठोकपणे सांगणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शार्जिल उस्मानी येऊन गेला तरी काही करु शकले नाहीत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांनी फेसबुकवर पोस्ट लिहून मुख्यमंत्र्यांवर घणाघाती हल्ला केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांची फेसबुक पोस्ट

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मुख्यमंत्री विधानसभेत काय म्हणाले होते

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

शर्जील उस्मानी पाताळात गेला तरी त्याला सोडणार नाही, असं वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. मग आता ते पाताळात जाऊन शर्जीलला कधी पकडून आणणार, असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. शर्जील उस्मानी ही उत्तर प्रदेशातील घाण आहे, आमच्याकडील नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी सुनावले होते.

शार्जिल उस्मानीचं वादग्रस्त वक्तव्य

पुण्यातील एल्गार परिषदेत अलिगड मुस्लिम विद्यापीठाचा विद्यार्थी शार्जिल उस्मानीने वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. ‘हिंदू समाज आहा पूर्णपणे सडला आहे’ असं वक्तव्य त्याने केलं होतं. ‘हिंदुस्तान मे हिंदू समाज बुरी तरिकेसे सड चुका है’, शरजिल उस्मानी याचं हे विधान भारतीय दंडसंहितेच्या कलम क्रमांक 153A आणि 295A अनुसार गुन्हा ठरते, अशी तक्रार भाजपने पुणे पोलिसात केली होती.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.