Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जावयाच्या मारहाणीत सासऱ्याचा मृत्यू

अहेरी तालुक्यातील महागाव येथील खळबळजनक घटना..

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली १५ : घरगुती वादातून उफाळलेला राग आणि त्यातून थेट जीवघेणी मारहाण… गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यात शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. मद्यधुंद सासऱ्याने केलेल्या शाब्दिक वादाला उत्तर देताना जावयाने केलेल्या बेदम मारहाणीत सासऱ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.मृत व्यक्तीचे नाव रमेश पोचम दुर्गे (वय ५५, रा. महागाव, ता. अहेरी, जि. गडचिरोली) असे असून, आरोपी जावयाचे नाव चंद्रशेखर हिरालाल पवार (वय २५, रा. चितापूर तांडा, ता. चितापूर, जि. गुलबर्गा, कर्नाटक) आहे. अहेरी पोलिसांनी आरोपीस अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

वादातून बेदम मारहाण… मृत्यूशी झुंज अपयशी!..

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

पोलीस विभागानी दिलेल्या माहितीनुसार, रमेश दुर्गे यांची मुलगी आणि जावई हे कर्नाटकात वास्तव्यास असून, काही दिवसांपूर्वीच ते महागावला आले होते. १४ जून रोजी सायंकाळी रमेश दुर्गे यांनी मद्यधुंद अवस्थेत जावयाशी ‘इथे कशासाठी आला आहात?’ असा सवाल करत वाद घातला. वादाचे पर्यवसान उग्र भांडणात झाले आणि त्यावेळी चंद्रशेखर पवारने सासऱ्याला बेदम मारहाण सुरू केली.

मारहाण इतकी जबरदस्त होती की, जावयाने सासऱ्याच्या डोळ्यावर, छातीवर, पाठीवर आणि तोंडावर लाथाबुक्क्यांचा मारा केला. भांडण सोडवण्यासाठी धावलेल्या पत्नीसमोरच ही घृणास्पद मारहाण सुरू होती. या हल्ल्यात सासरा रस्त्याच्या कडेला कोसळला. पण एवढ्यावर न थांबता, चंद्रशेखरने सासऱ्याला पुन्हा बेदम मारहाण करत त्यांचा जीव घेतला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

पूर्वीही होता कौटुंबिक हिंसाचाराचा इतिहास..

मृत रमेश दुर्गे यांच्यावर याआधीही त्यांच्या पत्नीवर अत्याचार आणि मारहाण केल्याचे गुन्हे नोंदवले गेले होते. पत्नीवर संशय घेत असल्यामुळे त्यांच्यात वारंवार वाद होत असत. काही वर्षांपूर्वी त्यांच्या मुलीने चंद्रशेखर पवार याच्याशी प्रेमविवाह केला होता. नुकतीच ती मुलगी पतीसह माहेरी आली होती, आणि त्यातच हे क्रूरकृत्य घडले.

पोलिस मुख्यालयापासून ७ किमी अंतरावर घडलेली खळबळजनक घटना..

तालुका मुख्यालयापासून अवघ्या ७ किमीअंतरावर घडलेली ही घटना गावकऱ्यांमध्ये चर्चेचा आणि भयाचा विषय ठरली आहे. अहेरी पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेत आरोपी चंद्रशेखरला ताब्यात घेतले असून, मोका पंचनामा करून शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय येथे मृतदेह पाठविण्यात आले असून अधिक तपास अहेरी पोलिस ठाण्याचे ठाणेदार हर्षल एकरे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.