Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अखेर जव्हार, मोखाडा तालुक्यात कोरोना लसीकरणाची कोंडी फूटली

विवेक पंडित यांच्या पुढाकाराने 8 ठिकाणी कोरोना लसीकरण शिबीरे संपन्न.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

जव्हार, दि. 15 जून : कोरोना लसीकरणाबाबत असलेल्या अफवा आणि गैरसमजांमुळे जव्हार,मोखाडा सारख्या दुर्गम व आदिवासी भागात नागरिक लसीकरणासाठी पूढे येत नव्हते. त्यामुळे श्रमजीवी संघटनेचे संस्थापक तथा राज्यस्तरीय आदिवासी क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) विवेक पंडित यांच्या पुढाकाराने श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून तब्बल आठ ठिकाणी आज लसीकरण शिबीरे संपन्न झाली.

यावेळी श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी निवडणूकीच्या प्रचाराप्रमाणे प्रत्येक गाव-पाड्यांत जाऊन दारोदारी फिरून लसीकरणाबाबत जनजागृती केली. त्याला आदिवासी बांधवांनी चांगला प्रतिसाद दिल्याने या भागात अखेर लसीकरणाची कोंडी फूटली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मोखाडा तालुक्यातील वाशाळा, खोडाला, शिरगाव तसेच जव्हार तालुक्यातील वाळवंडा, बोरहट्टी (धरणपाडा), सावरपाडा या ठिकाणच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण शिबीरे पार पडली असून प्रत्येक ठिकाणी १०० पेक्षा जास्त नागरिकांनी लस घेतली.

आरोग्य विभागाला या ठिकाणी लसीकरण करण्यात जे अडथळे येत होते, ते दूर करण्यास श्रमजीवी संघटनेने केलेल्या प्रयत्नांमुळे लसीकरणाला गती मिळाली आहे.
विवेक पंडित स्वतः सर्व केंद्रांवर फिरून कार्यकर्ते आणि आरोग्य कर्मचारी यांचा उत्साह वाढवीत होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय लोहार, श्रमजीवी संघटनेचे सरचिटणीस विजय जाधव, जिल्हा उप प्रमूख सिता घाटाळ, विक्रमगड तालुकाध्यक्ष तूषार सांबरे, जव्हार तालुकाध्यक्ष कमलाकर भोरे, सचिव संतोष धिंडा, सचिव वसंत वाजे, युवक प्रमूख अजित गायकवाड व इतर पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.

हे देखील वाचा :

कोविड योद्धे श्रमजीवी युवा नेते प्रमोद पवार यांचा वाढदिवस तरुणांसाठी प्रेरणादायी

“बार्टी” तर्फे विविध ठिकाणी वृक्षारोपण

अहेरी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेता मुत्तना दोंतुलवार यांचे निधन

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.