Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कोविड योद्धे श्रमजीवी युवा नेते प्रमोद पवार यांचा वाढदिवस तरुणांसाठी प्रेरणादायी

  • कोविड सेंटर मधेच समर्पित राहत वाढदिवस साजरा.
  • अनावश्यक खर्च टाळत रुग्णांना औषधं दिली भेट.
  • प्रमोदच्या समर्पित कार्याचा अभिमान-विवेक पंडित.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

उसगाव : श्रमजीवी संघटनेचे प्रवक्ते आणि तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय असलेले श्रमजीवी संघटनेचे युवा नेते प्रमोद पवार यांचा वाढदिवस तरुणांसाठी प्रेरणादायी ठरला. गेले अनेक दिवस प्रमोद पवार हे कोरोना महामारीत समर्पित भावनेतून काम करताना दिसतात. आज वाढदिवशी देखील त्यांनी आपल्या समर्पित वृत्तीची छाप कायम ठेवली. आपला वाढदिवस त्यांनी श्रमजीवी कोविड सेंटर येथे औषधांची भेट देऊन कोरोना बाधित रुग्ण आणि कोविड सेंटरमधील आरोग्य सेवकांसोबत साजरा केला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यावेळी श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी प्रमोद यांच्या समर्पित वृत्तीचे कौतुक करत त्यांना आशीर्वाद दिले.

प्रमोद पवार हे गेले अनेक वर्षे प्रचंड ऊर्जेने विवेक पंडित यांच्या मार्गदर्शाखाली काम करत तरुणाच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. तळागाळातील, दुर्लक्षित, दुर्बल घटकांसाठी आणि अन्यायाविरोधात प्रमोद पवार नेहमीच आक्रमक वृत्तीने लढताना पाहायला मिळतात.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

त्यामुळे विवेक पंडित यांचे प्रमोद पवार यांच्यावर विशेष प्रेम. विवेक पंडित यांच्या शब्दाला प्रमाण मानत प्रमोद पवार समोर दिसेल ते काम निरपेक्षपणे करताना दिसतात. “प्रमोद सारखे समर्पित कार्यकर्ते संघटनेची शान आहेत, सन्मान आहेत मला प्रमोदचा अभिमान वाटतो” आशा शब्दात विवेक पंडित यांनी प्रमोद पवार यांचे कौतुक केले आणि एकप्रकारे त्यांच्या कार्याची पोच-पावती देत शुभाशीर्वाद दिले.

कोरोना काळात सतत लोकांना सेवा देत, वेळ पडल्यास प्रशासन शासनाशी संघर्ष करणारा या युवा नेता तरुण वर्गाला हवा हवासा वाटतो. शेकडो युवकांचा फैजफाट क्षणात उभा करणार प्रमोद पवार हा युवा नेता साद्या ठाणे पालघर जिल्ह्यात प्रचंड लोकप्रिय आहे.

अत्यंत सामान्य घरातून आलेला हे तरुण नेतृत्व सर्व सामान्यांच्या प्रश्नावर करत असलेले संघर्ष, आंदोलन, उपक्रम नेहमीच कौतुकास पात्र ठरलेले आहे. पोषण आहार आंदोलन, आरोग्य सेवेसाठी लढा, नादुरुस्त रस्त्याविरुद्ध टोल बंद करण्याचा यशस्वी लढा असे अनेक लढे प्रमोद पवार यांनी अभिनव पद्धतीने लढून जिंकले आहेत.

श्रमजीवी संघटनेची धगधगती तोफ असलेले प्रमोद पवार आज या दोन जिल्ह्यातील सर्वात लोकप्रिय आणि तरुणांचे आकर्षण असलेले युवा नेतृत्व म्हणून नावारूपाला आले आहे. संवेदनशील तेवढाच आक्रमक असलेल्या प्रमोद पवार यांची चुकीचे काम करणाऱ्यांवर प्रचंड दहशत आहे. गरिबांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध पेटून उठणाऱ्या प्रमोद पवार यांना आज श्रमजीवी संघटनचे संस्थापक विवेक भाऊ पंडित, संस्थापिका विद्युलता ताई पंडित, अध्यक्ष रामभाऊ वारणा, कार्याध्यक्ष  स्नेहा दुबे पंडित, जिल्हाध्यक्ष अशोक सापटे, प्रा. दिनेश काटले, डॉ. विनय पाटील, डॉ. वर्षा पाटील, डॉ. चिन्मयी, डॉ. सुखदा. मनोज सातवी आदींनी उदंड आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या.

तर अंबाडी परिसरात शेकडो तरुण एकत्र येऊन प्रमोद पवार यांचा सन्मान करत शुभेच्छा दिल्या. जिल्हा परिषदेचे विरोधीपक्ष नेते कैलास देवा जाधव, जिल्हा परिषद सदस्य दयानंद पाटील, कवाड उपसरपंच सोनाली पवार, म्हपोली उपसरपंच उबेद हलबे, युवा नेते निलेश गुरव, प्रशांत डोंगरे, आर्यन फाऊंडेशनचे कल्पेश बाळू जाधव, ऍड दिनेश जाधव, रुपेश जाधव , ऍड रोहित पाटील, असगर पटेल, भूषण घोडविनदे,निलेश चव्हाण, मुकेश पाटील, सागर जाधव, सचिन शेलार, भरत पठारे, प्रवासी वाहतूक युनियन अध्यक्ष भूषण जाधव, महेश ठाकरे, अल्पेश जाधव,शैलेश पाटील, राज ठाकरे, बारा बलुतेदार समाज संघटनेचे जिल्हा अध्यक्ष विनोद बंधू मोहिते इत्यादींनी स्वतंत्र कार्यक्रम ठेवत प्रमोद पवार यांचा जाहीर सन्मान केला.

हे देखील वाचा  :

“बार्टी” तर्फे विविध ठिकाणी वृक्षारोपण

‘मिहान’ मध्ये गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी नवी दिल्ली, मुंबई येथे उद्योग संमेलनाचे आयोजन करा : नितीन राऊत

ग्रामीण भागातील व्हेंटिलेटरची गरज पुर्ण होईल – मंत्री उदय सामंत

Comments are closed.