Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गुलाब,मोगरा व निशीगंध या फुलशेतीचा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत समावेश

Get real time updates directly on you device, subscribe now.

विवेक पंडित यांनी केलेल्या पाठपुराव्याची सरकारकडून योग्य दखल.

या निर्णयामुळे फुलशेती करणाऱ्या आदिवासीच नव्हे तर बिगर आदिवासी शेतकरी आणि शेतमजूर यांना रोजगाराचा एक उत्तम पर्याय निर्माण होईल – विवेक पंडित.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

उसगाव डेस्क 30 डिसेंबर:- गुलाब,मोगरा व निशीगंध या फुलशेतीचा, फळबाग लागवडीप्रमाणे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत समावेश करण्याचा पथदर्शी निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. याबाबत श्रमजीवी संघटनेचे संस्थापक तथा, राज्य स्तरीय आदिवासी क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) श्री विवेक पंडित यांना रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री श्री संदिपान भुमरे यांनी पत्र पाठवून माहिती दिली आहे. श्री. विवेक पंडित यांनी या निर्णयाचे स्वागत केले असून “गुलाब,मोगरा व निशीगंध या फुलशेतीचा समावेश रोहयो मध्ये केल्यामुळे फुलशेती करणाऱ्या आदिवासीच नव्हे तर बिगर आदिवासी शेतकरी आणि शेतमजूर यांना रोजगाराचा एक उत्तम पर्याय निर्माण झाला आहे, तसेच रोजगार हमी योजना खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक रोजगार निर्मितीचे साधन बनेल” असे मत, व्यक्त केले आहे. याबाबत श्री. पंडित यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.

vivek pandit

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील आदिवासी आणि दुर्गम भागात मोगरा आणि चाफा या फुलांची लागवड यशस्वी झाल्याचे विवेक पंडीत यांच्या निदर्शनास आले होते. शेतकऱ्यांचा या फुलशेतीकडे वाढता कल पाहून, रोजगार हमी योजनेत फळबाग लागवडीप्रमाणे फुलशेतीचाही समावेश केला तर
फुलशेती करणाऱ्या शेतकरी आणि शेतमजूर यांना मोठा दिलासा मिळेल, व यामुळे आदिवासीच नव्हे तर बिगर आदिवासी शेतकऱ्यांना देखील रोजगाराचा एक उत्तम पर्याय निर्माण होईल आणि रोजगार हमी योजना ख ऱ्या अर्थाने सर्वसमावेशक रोजगार निर्मितीचे साधन बनू शकेल अशी मागणी श्री. पंडित यांनी केली होती. फुलशेतीचा समावेश रोजगार हमी योजनेत करण्याबाबत त्यांनी वेळोवेळी शासनाचे लक्ष वेधले होते.

3 वर्षांपूर्वी नागपूर येथे झालेल्या एका शासकीय बैठकीत देखील, याबाबत मागणी करून या बदलामुळे होणारे सकारात्मक परिणाम विशद केले होते. तसेच अनेक वेळा राज्याचे मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे, रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री श्री संदिपान भुमरे, तसेच सचिव, मृदू व जलसंधारण, रोजगार हमी योजना आणि आयुक्त, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना यांना सातत्याने पत्रव्यवहार करून या मागणीचा पाठपुरावा केला होता.

बेरोजगारी हे कुपोषण व स्थलांतराचे एक महत्त्वाचे कारण आहे. दुर्गम भागातील आदिवासींना
रोजगार उपलब्ध करण्यासाठी ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने’ची अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे. त्यामुळे रोजगार हमी योजनेत योग्य ते बदल करून फुलशेतीचा समावेश रोजगार हमी योजनेत करावा, जेणेकरून फुलशेतीची लागवड मोठ्या प्रमाणात होईल आणि त्यातून शेतकरी व शेतमजूर यांना मोठ्या उपलब्ध होईल असे पंडित यांनी वेळोवेळी नमूद केले होते. तसेच उत्पादित होणाऱ्या शेतमालाला स्थानिक बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याबाबत निर्णय व्हावा, यासाठी केंद्रातील EGS च्या निधीचा विनियोग करता येईल असेही पंडित यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या या निर्णयाचे पंडित यांनी स्वागत केले असून, ग्रामीण भागात त्याची अंमलबजावणी योग्य प्रकारे करण्यात यावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.