Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

लॉकडाऊन नंतर पहिल्यांदाच परळी येथील वैजनाथ मंदिर आज पासून खुले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

बीड १६ नोव्हेंबर :-बारा ज्योतिर्लिंगा पैकी एक असलेल्या परळीच्या श्री वैजनाथ मंदिरात आज सोमवार निमित्त दर्शनासाठी मंदिर उघडण्यात आले आहे. राज्यातील सर्वच मंदिरं आज खुले करण्यात आली असली तरी योगायोग म्हणून आज सोमवार असल्याने परळी येथील वैजनाथ मंदिरात भक्तांनी सोशल डिस्टनसिंग ठेवत मोठ्या शिस्तीत दर्शनाला सुरुवात केली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

कर्नाटक,  आंध्रप्रदेशासह महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यातुन भक्त इथे दररोज दाखल होतात. परंतु कोरोना महामारीच्या धर्तीवर राज्यातील सर्वच मंदिरं बंद करण्यात आल्यामुळे भक्तांना दर्शनापासून मुकावे लागले होते. मात्र आज रात्रीपासुनच भक्तांनी दर्शनाला सुरुवात केली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.