Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कोरचीत फळवाटप व वृक्षारोपण 

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

कोरची :  कोविड काळातील उत्कृष्ट कामगिरी बद्दल जगभरात गौरवलेले राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कोरची तालुका शिवसेनेचे च्या वतीने कोरची येथील ग्रामीण रुग्णालयात फळवाटप व तहसिल कार्यालयात वृक्षारोपण करण्यात आले आहे.

पर्यावरण वाचविण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने प्रयत्न केले पाहिजे. पर्यावरणाच्या असमतोल पणामुळे आज बरेच परिणाम दिसून येत आहेत. पृथ्वीच्या तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे, वेळीअवेळी कुठे ओला दुष्काळ तर कुठे सुखा दुष्काळ पहायला मिळतो आहे.कुठेकुठे अतीशय पाऊस पडतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जिवीत व वित्त हानी झाली आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून कोरची तालुका शिवसेनेच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जयंती चे औचित्य साधून तहसील कार्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यावेळी तालुका प्रमुख रमेश मानकर, काँग्रेस पक्षाचे जिल्हा महासचिव मनोज अग्रवाल, नंदकिशोर वैरागडे, डॉ ईटनकर कृष्णा नरडंगे , तहसीलदार सी आर भंडारी, डॉ नरेश देशमुख, रमाकांत निबेकर,राजु गुरनुले,यादव खोब्रागडे,गुरुदेव मेश्राम, ,नवलसिंग हलामी,अशोक कडयामी, दिपक नरडंगे,वशीम शेख, वालदे,आरती मेश्राम, सुप्रिया मोहबे,आदि शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.

हे देखील वाचा :

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

…या परिचारिकेने गमंत म्हणून काढला व्हीडीओ अन् हा व्हीडीओ समाज माध्यमावर झाला व्हायरल!

उर्मिला मातोंडकरानी महाड पुरग्रस्त भागात जाणल्या महिलांच्या व्यथा

१०० कोटी हप्तेखोरीचा तपास पोहचला अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरात; तत्कालिन अधिकारी आणि डीसीपींची चौकशी सुरु

 

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.