Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पोस्को गुन्ह्यातील फरार आरोपीला अटक

गडचिरोली पोलीसांना मिळाले यश

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली, 05 नोव्हेंबर :- पोलीस स्टेशन एटापल्ली येथील पोस्को एक्ट गुन्ह्यातील फरार आरोपी सुंदरसाई घिस्सो मडावी 25 रा. करपनफुंडी ता. एटापल्ली यास अटक करण्यात गडचिरोली पोलीसांना यश मिळाले आहे. आरोपी सुंदरसाई मडावी ने 2 वर्षाच्या मुलींवर बलात्कार करून गेल्या 3 महिन्यांपासून फरार होता. या फरार आरोपी नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील भाग असलेल्या येलचिल, बुर्गी, ताडगाव अशा वेगवेगळ्या जंगल परिसरामध्ये लपून बसला असल्याने त्याचा शोध घेण्यास पोलीसांना अडचणींचा सामना करावा लागला.

3 नोव्हेंबरला पोलीसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे अभियान राबवून आरोपी सुंदरसाई मडावी यास करपनफुंडी गावात पकडून अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला जिल्हा सत्र व विशेष न्यायालय गडचिरोली येथे पोलीस कस्टडी रिमांड घेण्याकरीता हजर करण्यात आले. ही कारवाई पोलीस अधीक्षक निलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक अनुज तारे यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी हेडरी बापुराव दडस यांच्या नेतृत्वात पोउपनि श्रीकृष्ण शिंदे, पोउपनि संदीप व्हसकोटी व पोलीस मदत केंद्र बुर्गी येथील पोलीस अंमलदार यांनी केली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.