Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

शालीमार एलटीटी एक्सप्रेसच्या लगेज बोगीला लागली आग

जीवितहानी नाही, मुंबईकडे येणारी रेल्वे वाहतुक विस्कळीत

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई, 05 नोव्हेंबर :- मुंबई कडे येणार्या शालीमार एलटीटी एक्सप्रेसला नाशिक रोड रेल्वे स्थानकावर आग सकाळी 8.43 वा. ट्रेनच्या लगेज बोगीला आग लागली. आग लागल्याची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाने लगेचचा डब्बा प्रवासी डब्ब्यापासून वेगळा केला. स्थानकावर गाडी थांबली असतांना ही घटना घडली. यावेळी तातडीने प्रवाशांना खाली उतरवण्यात आले. या आगाीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर येत आहे. प्लॅटॅॅफाॅर्मवर अग्निशमन दलाचे जवान आग विझविण्याचे आटोकाट प्रयत्न करते आहेत. यामुळे मुंबईच्या दिशेने येणारी रेल्वे वातुक मात्र विस्कळीत झाली आहे.

बोगीला आग लागल्यामुळे नाशिक स्थानकावर सर्वत्र धुराचे लोट पहावयास मिळत आहे. या घटनेमुळे रेल्वे स्थानक परिसरात एकच गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळताच नाशिक अग्निशमन दलाचे बंब रेल्वे स्थानकावर दाखल झाले. दरम्यान आता आग नियंत्रणात आली असून कोणत्याही प्रवाश्याला दुखापत झाली नाही. लगेचचा डबा इंजिनच्या शेजारी असल्याने तो ट्रेनपासून वेगळा करण्यात आला आहे. लवकरच ही ट्रेन पुन्हा सुरक्षितपणे सुरू केली जाणार असल्याचे रेल्वे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. मात्र या आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे पण वाचा :-

 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.