Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

“कुंपणच शेत खात असेल तर…?”

अनेक तक्रारी करून ही अवैध मुरूम उत्खननाला कुणाचा वरदहस्त?

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गड़चिरोली दि,२६जुलै : भामरागड वनविभागांतर्गत येत असलेल्या बोटनफुंडी ते नारगुंडा मार्गावरील वनजमिनीतील मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करुन संबंधित कंत्राटदार रस्त्याच्या कामासाठी मुरुम आणि दगड राजरोसपणे  वापरला जात आहे. याबाबत एका सामाजिक कार्यकर्त्यांने भामरागड वनविभागाच्या वनसंरक्षकाना अनेकदा तक्रारी करुन सदर प्रकरणाची सखोल चौकशी करावी तसेच  दोषी  आढळल्यास संबंधितावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती.  मात्र वनविभागा कडून अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई न झाल्याने त्या अवैध उत्खननाला वरिष्ठांचा वरदहस्त आहे का ? की या प्रकरणी कंत्राटदाराने आर्थिक वजन ठेवल्याने कारवाई होत नाही का? प्रश्न उपस्थित होत आहे.

भामरागड वनविभागातील बोटनफुंडी-नारगुंडा मार्गाचे काम एका कंत्राटदारामार्फत सुरु आहे. मात्र सदर रस्ताचा भराव रस्त्यालगत असलेल्या वनजमिनीतील मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करुन वापर केला जात आहे. त्यामुळे वनविभागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.अवैधरित्या कंत्राटदाराने वनातील रस्त्यालगत हजारो ब्रास मुरूमाचे उत्खनन करून खंदके निर्माण झाली आहेत.या  बेसुमार उत्खनना मुळे शेकडो अनेक  मोठ  मोठी झाडे उन्मळून पडले आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

एवढेच नव्हे तर कंत्राटदाराने वनविभागाच्या  जमिनीतील मुरूम,  दगड , रेती रस्ता  आणि पुलाच्या बांधकामासाठी वापरून  शासनाचा कोट्यावधी चा  महसूल बुडविला आहे .मात्र या  प्रकरणी अनेक  तक्रारी करून देखील  वनविभागासोबत महसूल विभाग देखील  मूग  गिळून बसल्याने नागरिकांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली असल्याने प्रशासना च्या  तीव्र संताप व्यक्त केला  जात आहे.

या  प्रकरणी भ्रष्टाचार निवारण समितीचे जिल्हाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी भामरागड वनविभागाचे वनसंरक्षक यांना दोन वेळा तक्रार देऊन ही सदर प्रकरणाची साधी चौकशी देखील झाली नसल्याने याबाबत कोणत्या वरिष्ठ अधिकाऱ्याचा किवा लोकप्रतिनिधीचा दबावामुळे कारवाई केली  जात नाही असा प्रश्न  नागरिक विचारत आहेत. विशेष म्हणजे गड़चिरोलीचे जिल्हाधिकारी संजय मीना तसेच गड़चिरोली वनवृत्ताचे मुख्यवनसंरक्षक  डॉ  किशोर  मानकर  यांना प्रत्यक्ष भेटून या प्रकरणाची तक्रार  करून सुद्धा  कारवाई होत नाही  त्यामुळे “कुंपणच शेत खात असेल तर दाद कुणाकडे मागायची? ” असा प्रश्न  निर्माण झाला आहे. त्यामुळे अवैध  उत्खनना  प्रकरणी  येत्या सात दिवसात कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमूदत उपोषणाचा इशारा ताटीकोंडावार यांनी  दिला आहे .

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

रस्त्या निर्माण करताना वनातील ऐवैध उत्खनन  बाबत प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा करून  मुख्यवनसंरक्षकांना या संदर्भात निवेदन सादर केले होते. त्याअनुषंगान वनसंरक्षक (प्रादे.) गडचिरोली कार्यालयांतर्गत भामरागड वनविभागाचे उपवनसंरक्षक यांना तक्रारीची रितसर चौकशी करुन तसा अहवाल आपल्या कार्यालयात सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र एक महिन्याचा कालावधी लोटूनही चौकशी करुन अहवाल सादर करण्यात आलेला नाही. तसेच यासंबंधी कोणतीही नोटीस प्राप्त झाली नाही. यामुळे वनविभागात वरिष्ठांच्या आदेशाचे काटेकोरपणे पालन होत नसल्याने कार्यप्रणालीत पारदर्शकतेचा अभाव दिसून येत  आहे.

संतोष ताटीकोंडावार

सामाजिक कार्यकर्ते

हे देखील वाचा :-

धक्कादायक : वाघाच्या हल्ल्यात आणखी एक शेतकरी ठार…

सोशल मीडियावर नग्न फोटो पोस्ट करणे पडले महागात…

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.