Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली विद्युत सहाय्यकाचा वीज वाहिनीच्या दुरुस्तीचं काम करताना विजेचा धक्का लागून मृत्यू

गडचिरोली जिल्ह्यातील दर्शनी माल येथे हा प्रकार घडला.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

गडचिरोली, 19 जून – गावातील वीज सुरळीत करण्यासाठी विजेच्या खांबावर चढलेल्या विद्युत सहाय्यकाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज सकाळच्या सुमारास घडली. गडचिरोली जिल्ह्यातील दर्शनी माल येथे हा प्रकार घडला. वैभव जेंगठे (वय २४ वर्ष) असे मृत पावलेल्या विद्युत सहाय्यकाचे नाव आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

वैभव जेंगठे हा गडचिरोली तालुक्यातील येवली सर्कलचा विद्युत सहाय्यक होता. सकाळच्या सुमारास वीज वाहिनीच्या दुरुस्तीचे काम करण्यासाठी तो दर्शनी माल या गावातील खांबावर चढला होता. यावेळी अचानक विजेचा धक्का लागून त्याचा जागीच मृत्यू झाला. वैभव जेंगठे हा विजेचा खांबावरच लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

वैभव हा मूळचा ब्रम्हपुरी तालुक्यातील मरारमेंढा येथील आहे. तो मागील दीड वर्षापासून विद्युत सहाय्यक या पदावर काम करत होता. त्याच्या अशा दुर्दैवी मृत्यूने जेंगठे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आणि येवली परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.