Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

शहरात शिरला गवा रेडा, नागरिकांत भीतीचं वातावरण

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

सांगली, दि. ८ मार्च: सांगली शहरात गवा रेडा शिरल्याने नागरीक चांगलेच धास्तावले आहेत. विश्रामबागच्या गव्हरमेंट कॉलनीतील कुंभारमळा येथे गवा रेडयाचा वावर दिसून आला. हा गवा रेडा नागरी वस्तीत कुठून आला हे कळू शकले नाही. रवीवारी सायंकाळी 7 वाजल्यापासून रात्री 10 पर्यंत या गवा रेड्याचा वावर होता. तर काही नागरिक या गवा रेड्याच्या पाठलाग ही केला. यावेळी ही घटना वाऱ्यासारखी सर्व सांगलीत पसरली आणि बघ्याची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. तर घटनास्थळी प्राणीमित्र, पोलीस आणि वनविभाग दाखल झाले होते. तर अंधारात ऊसाचा शेतात घुसत गवा रेडा गायब झाला. मात्र आसपासच्या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

यावेळी वनविभाग यांनी गवा शोधण्यासाठी घटनास्थळी आले होते. गवा रेडाचा शोध सुरू होता. पण नागरिकांनी सहकार्य करावे. गवा रेडा निदर्शनास आला तर वन विभागाला तात्काळ संपर्क साधावा. असे आव्हान वनविभागाने केले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Comments are closed.