Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

स्पेशल रिपोर्ट: मुलीच करतात शेती ! घेतात विक्रमी उत्पादन

चौघी बहिणींनी स्वतः शेती कसून घेतला विक्रमी उत्पादन व निवडला स्वाभिमानाने जगण्याचा मार्ग

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, स्पेशल प्रतिनिधी – सचिन कांबळे

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

नांदेड, दि. ८ मार्च: अस कुठलच क्षेत्र नाही जिथे महिलांनी स्वतःला सिद्ध केलं नाही, कदाचित पुरुषापेक्षा काकणभर जास्त म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. नांदेड जिल्ह्यातील बनचिंचोली गावच्या बहिणींनी स्वतः शेती कसून विक्रमी उत्पादन तर काढलच शिवाय स्वाभिमानाने जगण्याचा योग्य मार्ग ही दाखवला आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

तसं पाहिलं तर शेती ही आपली संस्कृती त्या दृष्टीने आपण सर्व शेतकरीच,  पण शेती, व्यवसाय आणि इतर कामात पुरुषांचीच मक्तेदारी आहे. जमिनीच्या मशागतीची, पेरणी, पाणी देणे, फळपीक, अन्नधान्य यांची विक्री व्यवस्था ही सगळी कामे पुरुषच पाहतात पण नांदेड जिल्ह्यातील बनचिंचोली येथील धनश्री, पूजा आणि प्रीती पऊळ या बहिणींनी पूर्णवेळ व शेतीतील सर्व कामे स्वतः करून विक्रमी उत्पन्न काढुन शेती तोट्याचा सौदा नसल्याचे दाखवून दिले. नांगरने, कोळपणी, पेरणी, फवारणी, पाईप ची जोडणी अशी सर्व कामे या बहिनीच करतात.

हलाखीच्या परिस्थितीमुळे स्वतःची शेती असूनही दुसऱ्याकडे काम करणाऱ्या वडिलांच्या परिस्थितीची जाणीव ठेवून या मुलींनी नेटाने शेती केली. दोन वर्षातच चित्र पलटले. इतरांच्या तुलनेत एकरी दीडपट किंवा दुप्पट उत्पन्न मुलींनी काढून दाखवले. ऊस एकरी ९५ टन, कापूस एकरी २३ क्विंटल, हरभरा एकरी १८ क्विंटल, उसामध्ये आंतरपीक म्हणून तरबुजचे वेगळे नगदी अडीच लाखाचे उत्पन्न काढले.

अश्या कर्तबगार मुलीने आपल्या माय बापाचा नाव मोठे केले आहे .राज्यातील मंत्री, प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, विविध संस्था, यांनी या चौघी बहिणींच्या स्वाभिमानी आणि कष्टाची दखल घेऊन त्यांचा सन्मान ही केला आहे. या बहिणीच्या मेहनत आणि आत्मनिर्भयतेला आजच्या महिला दिनी लोकस्पर्श न्यूज नेटवर्कच्या मनःपूर्वक शुभेच्छा !

Comments are closed.