Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

तंबाखूचे व्यसन सोडा, सुदृढ आरोग्याशी नाते जोडा

आरोग्य विभागाचे जनतेला आवाहन

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

चंद्रपूर, 6 जून- तंबाखूचे शरीरावर होणाऱ्या दुष्परिणामाबाबत राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूरतर्फे जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. रॅलीचे उद्घाटन अपर जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे तसेच सहाय्यक जिल्हाधिकारी मरुगानंथम एम. यांनी हिरवी झेंडी दाखवून केली.

तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाचे शरीरावर होणारे दुष्परिणाम तसेच युवा पिढीला या व्यसनापासून दूर करणे या उद्देशाने सदर रॅली जिल्हाधिकारी कार्यालय ते जिल्हा सामान्य रुग्णालय पर्यंत काढण्यात आली. रॅलीमध्ये ‘आम्हाला अन्न हवे, तंबाखू नको’, ‘तंबाखू सुपारीचे व्यसन सोडा, सुदृढ आरोग्याची नाते जोडा’, ‘एकमेकांची साथ देऊ या, तंबाखूचा नाश करू या’ अशा घोषणा देऊन जनजागृती करण्यात आली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, अति. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविष्कार खंडारे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर सोनारकर, वैद्यकीय अधिकारी (बाह्य संपर्क) डॉद्य हेमंत कन्नाके, वैद्यकीय अधिकारी डॉद्य बंडू रामटेके, दंत शल्यचिकित्सक डॉ.आकाश कासटवार, , राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या जिल्हा सल्लागार डॉ. श्वेता सावलीकर, समुपदेशक मित्रांजय निरांजणे, तुषार रायपुरे तसेच आरोग्य विभागातील इतर अधिकारी व कर्मचारी, जिल्हा सामान्य रुग्णालयातील कर्मचारी, शासकीय नर्सिंग कॉलेज, प्रभादेवी नर्सिंग कॉलेज, झाडे नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.