Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

शासकीय वसतिगृह व निवासी शाळा विद्यार्थ्यांसाठी खुले

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:

गडचिरोली, दि. 02 फेब्रुवारी: देशात कोविड -19 ची महाभयकंर परिस्थिती उद्भ्वाल्यामुळे सर्व देशभर शासनाद्वारे लॉकडाऊन केल्या गेले होते. त्यामुळे गेल्या 10 महिन्यापासून समाज कल्याण विभागामार्फत चालविण्यात येणारे शासकीय वसतिगृहे व निवासी शाळा बंद करण्यात आलेल्या होत्या. कोविड-19 ची परीस्थिती नियंत्रणात येताच शासनाने यासाठी नागपूर विभागाचे डॉ. सिध्दार्थ गायकवाड, प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण नागपूर यांनी शासकीय वसतिगृहे व निवासी शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतलेला आहे.

कोविड परिस्थिती नियंत्रणात आण्यासाठी बरेचसे शासकीय व निवासी शाळा हया कोविड केअर सेंटर म्हणून देण्यात आलेले होते. सद्यस्थितीत शासनाने सर्व शाळा, महाविद्यालये सुरु करण्यास परवानगी दिलेली आहे. समाज कल्याण विभागाचे वसतिगृहे हे ग्रामिण व शहरी भागातील गरीब व उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुरु करण्यात आलेले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

विद्यार्थ्यांचे भवितव्य लक्षात घेता त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी नागपूर विभागातील सर्व निवासी शाळा वसतिगृहे सुरु करण्यात येत आहे. वसतिगृहे सुरु करण्याआधी सर्व वसतिगृहांची स्वच्छतेच्या बाबीवर विशेष लक्ष देण्यात आलेले आहे. त्यासाठी थर्मल स्कॅनर, ऑक्सीमीटर, सॅनिटायझर इ. व्यवस्था करण्यात आलेली आहे. तेव्हा पालकांनी आपल्या पाल्यांना वसतिगृहात पाठवावे तसेच ज्यांना सर्वातगृहात प्रवेश घ्यावयाचा आहे. त्यांनी नव्याने अर्ज करावे असे जाहीर आवाहन प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण विभाग नागपूरचे डॉ. सिध्दार्थ गायकवाड यांनी कळविले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.