Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पालकमंत्री ॲड. अनिल परब यांनी घेतला जिल्ह्यातील covid-19 च्या स्थितीचा आढावा

शासनातर्फे लागेल ती मदत तत्काळ उपलब्ध करून देऊ.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

रत्नागिरी दि. 25 जून : संगमेश्वर येथील एका 80 वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात असणाऱ्या covid-19 च्या स्थितीचा आढावा राज्याचे परिवहन मंत्री तथा पालकमंत्री ॲड. अनिल परब यांनी आज दूरध्वनीद्वारे जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांच्याशी संवाद साधून घेतला व आगामी काळात याबाबत घ्यायच्या खबरदारी बाबत निर्देश दिले

जिल्ह्यामध्ये नवीन प्रकारच्या बदल झालेल्या विषाणूच्या बाधेमुळे नऊ रुग्ण आढळल्याची माहिती होती यापैकी आठ रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून त्यांची प्रकृती व्यवस्थित आहे तथापि 80 वर्षीय एका वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झालाही महिला संगमेश्‍वर तालुक्यामधील रहिवासी होती सदर महिलेला इतरही गंभीर प्रकारचे आजार झालेले होते अशी माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांनी यावेळी दिली. संभाव्य स्थिती लक्षात घेऊन आगामी काळात नियोजन करून त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावीअशा सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
यासंदर्भात शासनातर्फे कोणत्याही स्वरूपाची मदत लागल्यास रत्नागिरी जिल्ह्यात ती तात्काळ उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी पालकमंत्री या नात्याने आपण पार पाडू असेही अनिल परब म्हणाले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

याबाबत वेळोवेळी प्राप्त होणारी माहिती पालकमंत्री श्री परब हे जिल्हा प्रशासनाकडून घेत असून पूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून याबाबतीत सतत मार्गदर्शन यांच्यातर्फे प्राप्त होत आहे.

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर सुरू झालेले ग्रामपंचायत स्तरावरील विलगीकरण कक्ष आणि तेथील सुविधा तसेच जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये असणारा ऑक्सिजनचा साठा याबाबतही पालकमंत्री अनिल परब यांनी यावेळी माहिती जाणून घेतली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा : 

नैसर्गिक संकटाचे विपरित परिणाम कमी करण्याच्यादृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्याची गरज – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

धनश्री ग्रुप तर्फे अंगणवाडी मदतनिसांना साडी-चोळी भेट व सत्कार

परीचारीका संघटनेच्या मागण्या तत्वता मान्य

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.