Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

परीचारीका संघटनेच्या मागण्या तत्वता मान्य

संप मागे घेण्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचे आवाहन.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

लातूर दि. २५ जून : महाराष्ट्र राज्य परीचारिका संघटना शिष्टमंडळासोबत राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात एका बैठकी दरम्यान शुक्रवार दि. २५ जून रोजी चर्चा करून सरकारने परिचारीकांच्या मागण्या तत्वता मान्य केल्या असल्याचे सागून संप मागे घेण्याचे आवाहन संघटना शिष्टमंडळाला केले.

राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूरचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या शिष्टमंडळासोबत चर्चा करतांना कोरोना प्रदुर्भाव काळात परिचरिकांनी अत्यंत महत्वपूर्ण योगदान दिले आहे, असे सांगून या परिस्थितीत त्याना योग्य न्याय देण्याची भूमिका शासनाची आहे, त्यामुळे संघटनेने केलेल्या सर्वच मागण्या तत्वतः मान्य केल्या आहेत, या मागण्याचे रीतसर प्रस्ताव त्वरित तयार करून घ्यावेत त्यास अंतिम मजुरी देण्यात येईल असे आश्वासन . देशमुख यांनी देऊन संप मागे घेण्याचे आवाहन संघटना पदाधिकारी यांना केले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सहजपणे मागण्या मंजुर होणे हे आमच्यासाठी सुखद धक्का असल्याचे सांगत संघटनेच्या प्रतिनिधींनीही संप मागे घेण्यासंबंधी केलेल्या आवाहनास सकारात्मक प्रतिसाद दिला.

यावेळी महाराष्ट्र राज्य परिचारीका संघटना लातूरच्या मनीषा शिंदे, सुनित्रा तोटे, अरूण कदम, राम सुर्यवंशी, रेणूका पाटील, दिपक सोळंके, उनिता देशमाने आणि विवेक वागलगावे यांच्या संघटनेचे पदाधिकारी शिष्टमंडळासोबत उपस्थित होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा  :

नववधूने घरातील दागिने आणि रोकड लांबवत लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी प्रियकरासोबत केला पोबारा

आत्मनिर्भर भारत निर्मितीसाठी योगदान देण्याचे राज्यपालांचे स्नातकांना आवाहन

हिंदमाता परिसरात रस्त्याची उंची वाढवल्याने वाहतूक सुरळीत राहण्यास मदत होईल – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

 

 

Comments are closed.