Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

हिंदमाता परिसरात रस्त्याची उंची वाढवल्याने वाहतूक सुरळीत राहण्यास मदत होईल – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

मुंबई डेस्क, दि. 25 जून : शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर रोडवर हिंदमाता उड्डाणपूल आणि परळ टीटी उड्डाणपूल यामधील रस्त्याची उंची वाढवून केलेल्या कामाचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आले.

या ठिकाणी रस्त्याची उंची वाढल्याने सखल भागात पाणी साचून होणारी वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यास मदत होईल, असे प्रतिपादन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यावेळी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी.वेलरासू, उपायुक्त विजय बालमवार आदी उपस्थित होते.

अधिक पावसामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडवर हिंदमाता परिसरातील सखल भागात पाणी साचल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असे. हा अनुभव लक्षात घेऊन महानगरपालिकेमार्फत येथील 180 मीटरच्या रस्त्याची उंची सध्याच्या पातळीपेक्षा 1.2 मीटरने वाढविण्यात आली आहे. या रस्त्याचे आज लोकार्पण करण्यात आले. यामुळे पूरजन्य परिस्थितीतही वाहतूक सुरळीत राहण्यास मदत होणार आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

गांधी मार्केट येथील मिनी पंपिंग स्टेशनच्या कामाची पाहणी

महात्मा गांधी मार्केट येथील लघु उदंचन केंद्राच्या (मिनी पंपिंग स्टेशन) सुरू असलेल्या कामाचीही मंत्री आदित्य ठाकरे यांनी पाहणी केली. या ठिकाणी पर्जन्य जलवाहिन्यांद्वारे प्रति मिनिट 2.33 लक्ष लिटर पाणी उपसण्याची क्षमता निर्माण होणार आहे. यावेळी महापौर किशोरी पेडणेकर, अतिरिक्त आयुक्त पी.वेलरासू आदी उपस्थित होते.

पूरजन्य परिस्थितीमुळे उद्भवणाऱ्या समस्या सोडविण्यास मदत होणार असल्याने या पंपिंग स्टेशनचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले.

हे देखील वाचा  :

आत्मनिर्भर भारत निर्मितीसाठी योगदान देण्याचे राज्यपालांचे स्नातकांना आवाहन

बॉलिवूड अभिनेत्री पायल रोहतगीला अहमदाबाद पोलिसांनी केली अटक

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर ED ची धाड…

 

Comments are closed.